PHOTO : 13 वर्षांत 8 फ्लॉप चित्रपट, असा आहे पीआर मॅनेजर ते अभिनेत्री होण्याचा प्रवास, आज आहे ₹ 600000000 ची मालकीण

Entertainment : या अभिनेत्रीने रविवारी आपल्या पहिला करवा चौथ साजरा केला. अभिनेत्रीने पीआर मॅनेजर म्हणून करिअरला सुरुवात केली. तर खरं तर अभिनेत्रीला बँकिंग क्षेत्रात काम करायचं होतं. 

नेहा चौधरी | Oct 22, 2024, 10:46 AM IST
1/7

आम्ही बोलत आहोत बर्थडे गर्ल आणि प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचाबद्दल. परिणीतीचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणातील अंबाला इथे झाला. 

2/7

शुद्ध देसी कुडीने बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली नाही, पण सुरुवातीला तिने 'बँड बाजा बारात' सारख्या अनेक हिट चित्रपटांसाठी पीआर असिस्टंट म्हणून काम केले.

3/7

त्यानंतर 2011 मध्ये 'लेडीज वर्सेस रिकी बहल'मधून परिणीतीने सहाय्यक अभिनेता म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झालं. यानंतर 'इशकजादे' चित्रपटात परिणीती लीड रोलमध्ये दिसली होती. 

4/7

परिणीती चोप्राला गायनाचीही आवड आहे. त्यांनी अनेक वेळा त्यांच्या चित्रपटातील गाण्यांना आवाज दिलाय. 2017 मध्ये, तिने तिच्या 'मेरी प्यारी बिंदू' या चित्रपटाच्या 'मन के हम यार नहीं' या शीर्षक गीत गायलंय. यानंतर परिणीतीने 'तेरी मिट्टी', 'मतलबी यारियां' सारख्या अनेक गाण्यांना आवाज दिलाय. 

5/7

खासदार राघव चड्ढा यांना दीर्घकाळ डेट केल्यानंतर परिणीती चोप्राने 13 मे 2023 ला आप नेते आणि खासदार राघव चड्ढा यांच्याशी लग्न केलं. त्याच वर्षी, 24 सप्टेंबर 2023 रोजी उदयपूरमध्ये पारंपारिक रितीरिवाजानुसार दोघांनी लग्न केलं. तिने दिल्लीत करवा चौथाचा सण साजरा केला. 

6/7

परिणीतीचे दावत-ए-इश्क, किल दिल, मेरी प्यारी बिंदू, नमस्ते इंग्लंड, जबरिया जोडी, संदीप और पिंकी फरार, मिशन राणीगंज, कोड नेम-तिरंगा हे चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. तिच्या हिट चित्रपटांमध्ये केसरी आणि अमर सिंग चमकीला या चित्रपटाचा समावेश आहे. 

7/7

तिच्या संपत्ती बोलायचं झालं तर ती 60 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. चित्रपट, रिॲलिटी शो आणि ब्रँड एंडोर्समेंट हे त्याच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहेत. परिणिती चोप्रा अनेक हर्बल स्किन आणि केस केअर ब्रँडचा प्रचार देखील करते. अनेक जाहिरातींमध्येही ती दिसलीय. याशिवाय अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यातही ती पुढे असते.