'ती आल्यापासून आयुष्य नरक झालं'; वहिदा रहमानमुळे खरंच 'त्या' अभिनेत्याचं लग्न मोडलं?

Guru Dutt Birth Anniversary : बॉलिवूडमध्ये विवाहबाह्य संबंध हे काही नवीन नाही. पण त्याकाळात अभिनेत्रीवर त्याचा जीव जडला आणि तीन जणांचं आयुष्य उद्धवस्त झालं. शेवटच्या क्षणी फ्लॅटचा दरवाचा उघताच त्याचा तो करुण अंत आजही अनेक प्रश्न उपस्थितीत करतो. 

नेहा चौधरी | Jul 09, 2024, 08:35 AM IST
1/11

गंभीर आणि दमदार अभिनयाने त्याने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अभिनयासोबत उत्तम दिग्दर्शक अशी त्याची ख्याती होती. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या या चिमुकल्याचे वडील हेड मास्तर आणि बँकर होते. तर आई शिक्षिका आणि लेखिका होत्या.

2/11

तरुण वयात जगाचा निरोप घेतलेला या चिमुकल्याच नाव आहे गुरु दत्त. त्यांचं खरं नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण. गुरु दत्त हे इंडस्ट्रीतील एक मोठं नाव होतं. ते एकदा नाही दोन वेळा प्रेमात पडले पण आयुष्यात इतक्या एकाकीपणा आला की त्यांनी मृत्यूला कवटाळलं.

3/11

गुरुदत्त यांनी वयाच्या 39 व्या वर्षी 10 ऑक्टोबर 1964 रोजी जग सोडलं. त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला. गुरु दत्त यांचं बालपण कोलकाता गेलं. तर त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर इंडस्ट्रीवर राज्य केलं. 

4/11

मीडिया रिपोर्टनुसार गुरु दत्त पहिल्यांदा त्या काळातील लोकप्रिय गायिका गीता दत्तच्या प्रेमात पडले होते. त्या काळात गीताच्या यांच्या घराबाहेर दिग्दर्शकांची रांग लागली असायची. त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नव्हती. गुरुदत्त आणि गीता यांची पहिली भेट ही बाजी चित्रपटादरम्यान झाली. 

5/11

या चित्रपटासाठी गीता यांनी गाणी गायली होती. यानंतर त्या गुरु दत्त यांच्या प्रेमात पडल्या होत्या असं म्हटलं जातं. दोघ एकमेकांना 3 वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्या तीन मुलंही झाली. सर्व काही चांगल सुरु होतं. पण काही वर्षांनी त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले. लग्नाच्या 4 वर्षांमध्ये त्यांचं नातं तुटण्यापर्यंत पोहोचले. 

6/11

मीडिया रिपोर्टनुसार या नात्यात तणाव होण्याच कारण ठरली एक अभिनेत्री. असं म्हटलं जातं की गुरु दत्त आणि एका अभिनेत्रीचं प्रेम प्रकरण यामागील कारण होतं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून वहिदा रहमान होत्या. 

7/11

गुरु दत्त यांनी वहिदा रहमान यांना 'सीआयडी' चित्रपटाद्वारे लॉन्च केलं होतं. गुरु दत्त आणि वहिदा रहमान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. यादरम्यान त्यांच्यामधील जवळीक वाढल्याची बातम्या समोर येत होत्या. हे गीता दत्त यांना कळल्यावर त्यांनी घर सोडलं. 

8/11

 गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्या लग्ना मोडण्यासाठी वहिदा रहमानला जबाबदार धरलं जातं. तर गुरु दत्तच्या आग्रहामुळे वहिदाही त्यांच्यापासून दूर गेली असं म्हटलं जातं. गुरू दत्तच्या बहिणीने 2018 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 'गुरु दत्तच्या तुटलेल्या लग्नासाठी वहिदा रहमानला विनाकारण जबाबदार धरलं गेलं. प्रेमाची व्याख्या करणे खूप कठीण आहे. गुरुदत्तने ना वहिदामुळे आत्महत्या केली ना गीता दत्तमुळे.'

9/11

मृत्यूच्या आदल्या रात्री गुरु दत्त आणि लेखर अबरार अल्वी हे पॅडर रोडवरील फ्लॅटमध्ये एकत्र होते. त्यावेळी अल्वी यांनी गुरु दत्त यांना दारुसोबत झोपेच्या गोळ्या न घेण्याचा सल्ला दिला होता. गुरु दत्त यांना झोप येत नसायची म्हणून ते गोळ्या घ्यायचे. त्या रात्री अल्वी न जेवता निघून गेले. त्यानंतर गुरु दत्तही जेवले नाही. दुसऱ्या दिवशी दरवाजा उघडला नाही म्हणून तो तोडला तर हे त्यांचा मृतदेह दिसला. अल्वी म्हणतात की, त्यांनी आत्महत्या नाही, तर दारुसोबत झोपेची गोळी घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. 

10/11

ललिता लाजमीने सांगितलं होतं की, वहिदा रहमानला गुरु दत्त यांच्या निधनाची बातमी कळताच त्या मद्रास (आताच चेन्नई) मध्ये शूटिंग करत होत्या. ही बातमी कळताच त्या मेकअपमध्येच फ्लाइट पकडून गुरुदत्त यांच्या घरी पोहोचल्यात. 

11/11

असं म्हणतात 9 ऑक्टोबरच्या रात्री गुरु दत्त यांना गीता दत्त यांचा फोन आला होता. त्यानंतर गुरु दत्त रागात होते असं म्हटलं जातं. त्यादिवशी त्यांचा मूड खूप खराब होता, असं अल्वी यांनी त्यांच्या टेन इयर्स विथ गुरु दत्त या पुस्तकात म्हटलंय. गीता या मुलांही गुरु दत्त यांना भेटू देत नव्हती. प्रत्येक फोनवर त्यांचा वाद व्हायचा.