PHOTO: वयाच्या पस्तिशीतही मिळेल सरकारी नोकरी! 'ही' क्षेत्र अजूनही तुमची वाट पाहतायत

Government Jobs After 35 age: वयाच्या पस्तिशीनंतरही सरकारी नोकरी मिळण्याच्या अनेक संधी असतात. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकता.

Pravin Dabholkar | Jun 14, 2024, 16:03 PM IST
1/10

वयाच्या पस्तिशीतही मिळेल सरकारी नोकरी! 'ही' क्षेत्र अजूनही तुमची वाट पाहतायत

Government Jobs After 35 age indian Railway Staff Selection Banking Vacancy

Government Jobs After 35 age : आजही सरकारी नोकऱ्यांची खूप क्रेझ आहे. स्थिरता, पगार आणि पेन्शन इत्यादी काही पैलू आहेत ज्यामुळे लोक अजूनही सरकारी नोकऱ्या करण्यास प्राधान्य देतात. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं की अनेकजण सरकारी नोकरी शोधायला सुरुवात करतात. सरकारी नोकरी मिळावी यासाठी विविध परीक्षा देतात. क्लासेस लावेल जातात. 

2/10

नोकरी मिळण्याच्या अनेक संधी

काही लोकांसाठी सरकारी नोकरीचे स्वप्न लवकर पूर्ण होते तर काहींसाठी वेळ लागतो. वयाची तिशी ओलांडल्यानंतर अनेकजण सरकारी नोकरीचा हट्ट सोडून देतात. पण वयाच्या पस्तिशीनंतरही सरकारी नोकरी मिळण्याच्या अनेक संधी असतात. अशी काही क्षेत्रे आहेत जिथे तुम्ही सरकारी नोकरीसाठी अर्ज करु शकता. 

3/10

स्टाफ सिलेक्शन

स्टाफ सिलेक्शन कमिशन सारखी केंद्र सरकारची संस्था दरवर्षी निरीक्षक, लेखा परीक्षक, सहाय्यक इत्यादी पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करते. यासाठी सहसा अनुभवी उमेदवारांची मागणी केली जाते. 35 वर्षांपर्यंतचे उमेदवार यापैकी अनेक पदांसाठी अर्ज करू शकतात.

4/10

या नोकऱ्यांसाठी अर्ज करा

35 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अनेक केंद्र सरकारच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. ASO, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, डेप्युटी डायरेक्टर सारख्या पदांसाठी AAI, NHAI सारख्या ठिकाणी भरती होत असते.

5/10

राज्य सरकारची भरती

याशिवाय, तुम्ही राज्य सरकार अंतर्गत होणाऱ्या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. यासोबतच तुम्ही एमपीएससी (MPSC) सारख्या राज्य सरकारच्या परीक्षा देऊ शकता. 

6/10

या संस्था नोकऱ्या देतात

काही संस्थांमध्ये 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी वेळोवेळी भरती सुरु असते.  BHEL, ONGC, SAIL, NTPC या संस्थांच्या वेबसाइटवर लक्ष ठेवा. येथील करिअर सेक्शनमध्ये तुमच्या कामाची माहिती असू शकते. 

7/10

डिफेन्स सेक्टर

डिफेन्स सेक्टरमध्ये 42 वर्षांपर्यंतचे उमेदवार अनेक पदांसाठी अर्ज करू शकतात. येथे वेळोवेळी भरती होत असते. येथे तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.

8/10

बँकिंग सेक्टर

बँकिंग सेक्टरमध्ये वेळोवेळी भरती निघत असते. तुम्ही 35 किंवा 40 वर्ष वयाचे असाल तरी या पदांवर नोकरी मिळू शकते. संबंधित क्षेत्राच्या कामाचा तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे.  

9/10

भारतीय रेल्वे नोकऱ्या

भारतीय रेल्वेच्या नोकऱ्यांना प्रत्येक श्रेणीतील उमेदवारांमध्ये जास्त पसंती दिली जाते. येथे, 42 वर्षांपर्यंतचे उमेदवार वरिष्ठ विभागात इंजिनीअरसारख्या काही पदांसाठी अर्ज करू शकतात.

10/10

UPSC आणि राज्य सेवा परीक्षा

UPSC मध्ये, राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयाच्या 42 वर्षापर्यंत अर्ज करण्याची सुविधा मिळते. तर राज्यसेवा परीक्षेत साधारणपणे वयोमर्यादा 40 वर्षे असते. तुम्ही येथे अर्ज करू शकता.