दहावी-बारावीनंतर 'येथे' मिळेल थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर करा अर्ज

दहावी बारावीत उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकारी नोकरीच्या संधी जाणून घेऊया.

Pravin Dabholkar | May 06, 2024, 14:23 PM IST

Government Job After 10th 12th: दहावी बारावीत उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकारी नोकरीच्या संधी जाणून घेऊया.

1/9

दहावी-बारावीनंतर थेट सरकार नोकरी, निकाल लागल्यावर 'येथे' करा अर्ज

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

Government Job After 10th 12th:  महाराष्ट्र बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. परीक्षा दिलेले विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी अनेकजण दहावी, बारावीच्या परीक्षानंतर सरकारी नोकरीचे अर्ज भरायला सुरु करतात. निकालानंतर या विद्यार्थ्यांना कोणत्या संधी आहेत? जाणून घेऊया. 

2/9

दहावी निकालानंतर

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

  दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही भारतीय टपाल विभागात पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफसहित इतर पदांवर अर्ज करु शकता. यासाठी वेळोवेळी निघणाऱ्या नोटिफिकेशनवर लक्ष ठेवा.

3/9

दहावीनंतर आयटीआय

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

रेल्वे ट्रॅकमन, गेटमन, पॉइंटमन, हेल्पर, पोर्टर सहित अनेक पदांवर अर्ज करु शकता. दहावीनंतर आयटीआय केलेले उमेदवार रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदावर थेट भरती होऊ शकतात. 

4/9

पोलीस विभाग

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

दहावीनंतर पोलीस विभागात नोकरी करु इच्छिणारे भारतीय आर्मी, भारतीय नेव्ही किंवा भारतीय एअरफोर्समधील विविध पदांसाठी अर्ज करु शकतात.

5/9

फॉरेस्ट गार्ड

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

अनेक राज्यांमध्ये फॉरेस्ट गार्ड पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागवले जातात. येथे तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची संधी असते.

6/9

बारावीनंतर सरकारी नोकरी

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

बारावीनंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये विविध भरतींसाठी अर्ज करु शकता. यामध्ये सैन्यापासून स्टेनोग्राफरपर्यंत अनेक पदांची भरती सुरु असते. 

7/9

रेल्वेमध्ये नोकरी

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

रेल्वेमध्ये एएलपी, सहायक लोको पायलट, आरआरबी एनटीपीसी सहित अनेक पदांवर अर्ज करु शकता. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल.

8/9

पोलीस विभाग

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

पोलीस विभागामध्ये कॉन्स्टेबल पदांवर भरती केली जाते. यासाठी बारावी उमेदवार अर्ज करु शकतात. 

9/9

टपाल विभाग

Government Job after 10th 12th Apply After Result Out Career Marathi News

टपाल विभागात जीडीएस, सहायक, पोस्टमन सहित अनेक पदांवर नेहमी भरती होत असते. यासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.