गणपती दर्शनाला मुंबईत जाताय? तर या 10 मंडळांच्या बाप्पांना नक्की भेट द्या

प्रत्येक मंडळ दरवेळी निरनिरळ्या संकल्पना घेऊन येते. भाविकांची लाखोंच्या संख्येत उपस्थिती असते. या मंडळांमध्ये चुरस लागलेली असते. काही मंडळेतर एवढी नावाजलेली आहेत की, दर्शनासाठी भाविक दिवसभरसुद्धा रांगेत उभे राहतात.

Sep 09, 2024, 18:16 PM IST

गणपती बाप्पाच्या येण्याने सगळीकडे आनंदाचे वातावरण निर्माण होते. सर्वात जास्त जोशात गणेश मंडळे असतात. आणि ही मंडळे गणेशोत्सवात मुंबईची शान असतात. त्यांनी केलेली आरास बघायला आवर्जून जा.

1/11

दर वर्षीप्रमाणे या वर्षीही मुंबईतील गणेश मंडळांनी ,जोरदार तयारी केली आहे . प्रत्येक मंडळ आपापल्यापरीने सजावट करत असते. मुख्य म्हणजे तोचतोचपणा कोणत्याच मंडळात बघायला मिळत नाही. प्रत्येक मंडळ दरवेळी निरनिरळ्या संकल्पना घेऊन येते. भाविकांची लाखोंच्या संख्येत उपस्थिती असते. या मंडळांमध्ये चुरस लागलेली असते. काही मंडळेतर एवढी नावाजलेली आहेत की, दर्शनासाठी भाविक दिवसभरसुद्धा रांगेत उभे राहतात.

2/11

जुहू गणेश मंडळ

जुहू चौपाटी जवळच या मंडळाचा बाप्पा बसतो. हे मंडळ फारच वेगळी आणि मस्त सजावट करते. भाविकांचे मुख्य आकर्षण म्हणजे मंडळाने केलेले समुद्रकिनाऱ्याच्या थिमचे देखावे. समूद्राची पार्श्वभूमी खूप सुंदर दिसते . जुहू हे  पश्चिम मुंबईत असून विले-पार्ले या स्थानकावर उतरुन, मंडळात जाता येते.   

3/11

गणेश चतुर्थी मंडळ वरळी

हे मंडळ अधुनिकतेसाठी प्रसिद्ध आहे . मंडळाची सजावट पर्यावरणस्नेही असते. मंडळ  पर्यावरणासाठी अनुकूल असणाऱ्या साहित्याचा वापर करते . पारंपारिकतेला अधुनिकतेची साथ देऊन सण साजरे करता येतात ,हे या मंडळाने दरवर्षी सिद्ध केले आहे . वरळी हे दक्षिण मुंबईत आहे. पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी स्थानकावर उतरून , रिक्षा करून मंडळापर्यत जाता येते . 

4/11

दादरचे गणेश मंडळ

हे मंडळ विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करते. मंडळ त्याच्या सर्वसमावेशक भुमिकेसाठी चर्चेत असते . मंडाळात बसणारी मूर्ती ही पारंपारीक आणि सुंदर असते . दादरसारख्या शहरात असल्याने मंडळाचे वातावरण मुंबईच्या संस्कृतीची जाण करून देणारे असते. दादर मध्य मुंबईत स्थित आहे . दादर स्थानकावर मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गावरच्या रेल्वे थांबतात.  

5/11

वांद्र्याचे श्री गणेश मंडळ

हे मंडळ त्याच्या खेळीमेळीच्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे . मंडळात भाविक सहपरिवार येतात. कारण मंडळ कौटुंबिक खेळांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. मंडळात पारंपारीक छानशी मूर्ती विराजमान होते . कौटुंबिक वातावरणात उत्सव साजरा करण्यासाठी लोक या मंडळाला भेट देतात . वांद्रे शहर पश्चिम मुंबईत आहे. वांद्रे रेल्वे स्थानकावर उतरुन, मंडळापर्यत पायी जाऊ शकता.   

6/11

जी.एस.बी सेवा मंडळ

या मंडळाचा बाप्पा उत्कृष्ट देखावा आणि सुवर्ण मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. हे मंडळ सर्व प्रथा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणारे आहे . या मंडळाची ख्याती ही सोन्याच्या मूर्तीमुळे जास्त आहे. डोळे दिपवणारी सजावट मंडळ करते . हे मंडळ मुंबईतल्या किंगस् सर्कलला आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकावर उतरुन मंडळाला पायी जाता येते.

7/11

खेतवाडीचा गणराज

खेतवाडी मंडळाचा बाप्पा हा फार वाजत-गाजत मंडपात विराजमान होतो. भाविकांचे मुख्य आकर्षण म्हणजे या मंडळाच्या बाप्पाची भव्यदिव्य उंच मूर्ती . मंडळातील मूर्ती मोठी आणि फार आकर्षक असते. खेतवाडी दक्षिण मुंबईत आहे. ग्रँट रोड या रेल्वे स्थानकावर उतरून मंडळापर्यत चालत जाता येते.  

8/11

श्री गणेश मंडळ ,गणेश गल्ली

हे मंडळ दरवर्षी कोणत्यातरी सामाजिक विषयावर आधारीत देखावा उभारते . मंडळ अश्या देखाव्यांसाठी आणि रेखीव मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे . मूर्ती फार कलात्मकतेने आणि सर्जनशीलतेने बनवलेली असते. गणेश गल्ली गिरगावमध्ये आहे . ग्रँट रोड या पश्चिम रेल्वे स्थानकावर उतरून, मंडळापर्यत चालत जाता येते.  

9/11

मुंबईचा राजा

मुंबईचा राजा मंडळ हे समकालीन समस्यावर आधारित देखावे तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मंडळ प्रत्येक गणेशोत्सवात काहीतरी हटके कल्पना आपल्या सजावटीतून भाविकांसमोर प्रस्तुत करते. विविध शहरांतून लोकं बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात. हे मंडळ परळ मधील गणेश नगरमध्ये आहे. मध्य रेल्वेच्या परळ या स्थानकावर उतरून मंडळापर्यंत चालत जाता येते. 

10/11

चिंचपोकळीचा चिंतामणी

चिंचपोकळीचा चिंतामणी एक ऐतिहासिक वारसा लाभलेले मंडळ आहे . मंडळाचा मुख्य हेतु परंपरा जोपासणे आहे . मंडळातील बाप्पाची पूजा-अर्चा पूर्वापार चालत आलेल्या नियमांना , चालीरीतींना अनुसरुन होते . मंडळाचा देखावादेखील पारंपारीक असतो . मंडळ त्याच्या साधेपणासाठी ओळखले जाते. चिंचपोकळी शहर मध्य मुंबईत आहे . मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी स्थानकावर उतरुन ,चालत मंडळात जाता येते .  

11/11

लालबागचा राजा

मुंबईतील सर्वांत जास्त नावाजलेले मंडळ म्हणजे लालबागचा राजा. या मंडळाची गणेश मूर्ती फारच सुंदर असते. ही मूर्ती सुमारे 18 ते 20 फुटाची असते आणि कांबळ्यांच्या कारखान्यात बनवली जाते. कांबळे गेली 80 वर्षे बाप्पाची सुबक मूर्ती बनवत आहेत. लालबागचा राजा नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. राजा भाविकांच्या इच्छा पुर्ण करतो ,असे मानले जाते. दरवर्षी काहीतरी वेगळा देखावा मंडळ उभा करते. दर्शनासाठी नवसाची वेगळी आणि मूखदर्शनाची वेगळी अश्या दोन रांगा असतात. चिंचपोकळी किंवा भायखळाला उतरुन मंडळाला जाता येते. छत्रपती शिवाजी मैदानावरुन दर्शनाला जाऊ शकता.