8 जेट, 4000 कोटींचा महल, 5000 कोटींचे यॉट, अंबानी-अदानीपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत... कोण आहे प्रिन्स शेख खालिद?

Mohamed bin Zayed Al Nahyan Property : आबू दाभीचे प्रिन्स शेख खालिद उर्फ मोहम्मद बिन जायद अल नाहयान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर (Nahyan India Visit) आहेत. प्रिन्स शेख खालिद यांनी सोमवारी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. (Abu Dhabi Crown Prince meet PM Modi) या भेटीत दोन्ही देशांचे राजकीय संबंध वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. प्रिन्स शेख खालिद हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबातले आहेत. त्यांची संपत्ती अंबानी-अदानी यांच्यापेक्षा कितीपतरी पटीने जास्त आहे.

| Sep 09, 2024, 17:51 PM IST
1/7

8 जेट, 4000 कोटींचा महल, 5000 कोटींचे यॉट, अंबानी-अदानीपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत... कोण आहे प्रिन्स शेख खालिद?

2/7

प्रिन्स शेख खालिद उर्फ मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे यूएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद उर्फ जायद अल नाहयान (Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan) यांचे मोठे पूत्र आहेत. फेब्रुवारी 2016 मध्ये प्रिन्स शेख खालिद यांना यूएईच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं. यानंतर मार्च 2023 मध्ये त्यांना अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स म्हणून निवडण्यात आलं. याबरोबरच प्रिन्स शेख खालिद हे अबू धाबी एक्झिक्यूटिव्ह काऊंसिलचे अध्यक्षही आहेत. 

3/7

प्रिन्स शेख खालिद यूएईमधल्या अल नाहयान कुटुंबाचे सदस्य आहेत. अल नाहयान हे जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळखलं जातं. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार 2023 मध्ये अल नाहयान कुटुंबाची एकूण संपत्ती 305 अरब डॉलर म्हणजे जवळपास 26 लाख कोटी रुपये इतकी आहे.

4/7

अल नाहयान कुटुंबाची संपत्ती उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती जवळपास 111 अरब डॉलर तर गौतम अदानी यांची संपत्ती 99.6 अरब डॉलर इतकी आहे. अल नाहयान कुटुंबाची संपत्ती एलन मस्क यांच्यापेक्षाही अधिक आहे. एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. एलन मस्क यांची संपत्ती 237 अरब डॉलर इतकी आहे. 

5/7

अल नाहयान कुटुंबाच्या संपत्तीत अबू धाबीतल्या राष्ट्रपती महलाचाही समावेश आहे. हा महल 3.80 लाख स्क्वेअर फूटात पसरला असून याची किंमत 475 मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 4 हजार कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय जगभरातील अनेक देशात अल नाहयान कुटुंबाचे अलिशान बंगले आहेत. एका रिपोर्टनुसार अल नाहयान कुटुंबाकडे अज्जम आणि ब्लू सुपरयॉट सारख्या महागड्या यॉट आहेत. याची किंमत 600 मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 5 हजार कोटी रुपये इतकी आहे.

6/7

अल नाहयान कुटुंबाजवळ 8 प्रायव्हेट जेट विमानं आहेत. याची किंमत 478 मिलिअन डॉलर म्हणजे 4 हजार कोटी रुपये इतकी आहेत. याशिवाय नाहयान कुटुंबाकडे तब्बल 700 लक्झरी गाड्यांचा ताफा आहे. यात 'हमर एच1 एक्स3, द जाबियन, बुगाटी वेरोन, फरारी 599 एक्सएक्स, मेकलॅरेन एमसी12 आणि लँबोर्गिनी रेवेनटन यासारख्या कोट्यवधी रुपयांच्या गाड्या आहेत. 

7/7

अल नाहयान कुटुंबाच्या कमाईचं मुख्य स्त्रोत ते तेल भंडार आहे. जगातील तेल भंडारातील जवळपास सहा टक्के हिस्सा हा या कुटुंबाचा आहे. अल नाहयान कुटुंबाची जगभरातील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. एलन मस्क यांच्या स्पेसएक्समध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. इंग्लंड प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या मँचेस्टर सिटीची मालकीही अल नाहयान कुटुंबाकडे आहे.