रुग्णालयात अत्यल्प दरात मिळणार औषधे, 'या' 14 जिल्ह्यात जेनरिक मेडिकल सुरु करण्याचा निर्णय

Generic Medical in Government Hospital: राज्यातील सरकारी रुग्णालयात जेनेरिक मेडिकल सुरु होणार आहेत. याद्वारे रुग्णांना अत्यल्प दरात औषधे मिळणार आहेत. रुग्णांना परवडणारी औषधे मिळावीत यासाठी केंद्र सरकारने जेनरिक मेडिकलचा पर्याय समोर आणला. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही सुविधा होती. आता या सुविधेचा आवाका वाढविण्यात आला आहे.

Pravin Dabholkar | Jul 25, 2023, 20:46 PM IST
1/8

रुग्णांलयात अत्यल्प दरात मिळणार औषधे, 14 जिल्ह्यात जेनरिक मेडिकल सुरु करण्याचा निर्णय

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

Generic Medicine Shops: राज्यातील सरकारी रुग्णालयात जेनेरिक मेडिकल सुरु होणार आहेत. याद्वारे रुग्णांना अत्यल्प दरात औषधे मिळणार आहेत. रुग्णांना परवडणारी औषधे मिळावीत यासाठी केंद्र सरकारने जेनरिक मेडिकलचा पर्याय समोर आणला. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही सुविधा होती. आता या सुविधेचा आवाका वाढविण्यात आला आहे.

2/8

राज्य सरकारचा निर्णय

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

केंद्राच्या जेनेरिक औषध योजनेंतर्गत राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 18 सरकारी वैद्यकीय आणि दंत महाविद्यालये आणि दुर्गम भागात असलेल्या रुग्णालयांमध्ये चोवीस तास जेनेरिक औषधांची दुकाने सुरू राहणार आहे. 

3/8

सुविधा वाढवणार

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

हा उपक्रम प्रथम चार वैद्यकीय संस्थांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने हा प्रकल्प आता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत 14 सुविधांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

4/8

14 जिल्ह्यात सुविधा

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

गोंदिया, औरंगाबाद, नागपूर, मिरज, चंद्रपूर, जळगाव, लातूर, अकोला, यवतमाळ, सातारा, उस्मानाबाद, नंदुरबार, सिंधुदुर्ग आणि अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दवाखाने सुरू होणार आहेत.सर्वसामान्यांना आता दवाखान्यात स्वस्त दरात औषधे मिळण्याची सुविधा मिळेल,' असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

5/8

तांत्रिक समितीद्वारे देखरेख

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

नॅशनल फेडरेशन ऑफ फार्मर्स प्रोक्युरमेंट प्रोसेसिंग अँड रिटेलिंग को-ऑपरेटिव्ह ऑफ इंडिया (NACOF) द्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने दुकाने स्थापन केली आहेत. या दुकानांवर तांत्रिक समितीद्वारे देखरेख केली जाईल. ही दुकाने दर सहा महिन्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला आपला अहवाल सादर करतील असेही त्यांनी सांगितले.

6/8

औषधे खूपच कमी किंमतीत

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

सध्या शासकीय रुग्णालयांमध्ये विविध आजारांसाठी लागणारी सर्व औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. ब्रँडेड औषधे महाग असली तरी जेनेरिक औषधे खूपच कमी किंमतीत मिळू शकतात. 

7/8

फरक 70% पर्यंत

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

साधारणपणे, ब्रँडेड आणि जेनेरिक औषधांमधील किंमतीतील फरक 70% पर्यंत असू शकतो. अशाप्रकारे, जेनेरिक औषधे खर्चात लक्षणीय घट करू शकतात, असे राज्य आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

8/8

इतर ब्रँडेड औषधे

Generic medical in Government hospitals patients will get medicines at lowest rates

या दुकानांवर जेनेरिक औषधे उपलब्ध नसल्यास, इतर ब्रँडेड औषधे रुग्णांना उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.