विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viral

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral: मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभानंतरचे मुंबई विमानतळावरील विराट कोहलीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विराटच्या मोबाईलवरील वॉलपेपरवरील व्यक्ती कोण आहे जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jul 06, 2024, 19:21 PM IST
1/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मुंबईमध्ये टी-20 वर्ल्ड कप विजयाचं सेलिब्रेशन केल्यानंतर त्याच दिवशी लंडनला रवाना झाला.   

2/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

वानखेडेमध्ये बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील सर्व सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यानंतर विराट थेट मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. (फोटो सौजन्य - फिल्मीग्यान/इन्स्टाग्राम अकाऊंट)

3/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

विराट मुंबईहून थेट लंडनला पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना भेटण्यासाठी गेल्याचं सांगितलं जात आहे. फायनल जिंकल्यानंतरही विराट फोनवरुन आपल्या मुलांशी बोलत असल्याचं बार्बाडोसच्या मैदानात 29 जूनला पाहायला मिळालं होतं. 

4/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

मुंबई विमानतळावर मेहंदी कलरचं जॅकेट, पांढरं टी शर्ट अन् क्रिम कलरची पॅण्ट अशा लूकमध्ये विराट पापाराझींनी स्पॉट केला. विराटचे विमानतळावरील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य - फिल्मीग्यान/इन्स्टाग्राम अकाऊंट)

5/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

मात्र विराटचे हे फोटो समोर आल्यानंतर सध्या सोशल मीडियावर त्याच्या मोबाईलच्या वॉलपेपरची चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसत आहे. विराटच्या मोबाईलच्या वॉलपेपरवर अनुष्का किंवा त्याच्या मुलांचा फोटो नसून एका वेगळ्याच व्यक्तीचा फोटो चाहत्यांना दिसून आला आहे.

6/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

विराटच्या मोबाईलवर नीम करोली बाबांचा फोटो असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. 

7/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

नीम करोली बाबा हे अध्यात्मिक गुरु असून जगभरातील अनेक लोकांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. विराटही त्यांचा भक्त असल्याचं सांगितलं जातं.

8/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

केवळ विराट कोहली आणि अनुष्का शर्माच नाही तर अगदी मार्क झुकरबर्ग आणि स्टीव्ह जॉब्ससारख्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांनाही प्रेरणा दिल्याचं सांगितलं जातं. 

9/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

मागील वर्षी विराट आणि त्याची पत्नी अनुष्का हे दोघे नीम करोली बाबांच्या आश्रमात गेले होते. हे आश्रम कांइनची धाममध्ये असून त्याची स्थापना 1964 साली झाली आहे. 

10/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

सोशल मीडियावर अनुष्काने होळीच्या दिवशी नीम करोली बाबांसाठी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन आदरांजली वाहिली होती.

11/11

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral

भक्तांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांनुसार नीम करोली बाबा हे हनुमानाचं रुप असल्याचं सांगितलं जातं. हॉलिवूड अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स सुद्धा नीम करोली बाबांची भक्त असल्याचं सांगितलं जातं.