पावसात कपड्यांना दुर्गंधी येते? मग सोप्या टीप्स वापरुन पाहा...

पावसाळ्यात सुर्यप्रकाश फार मिळत नाही, त्यामुळे कपडे ओलसर राहतात.  

Jul 06, 2024, 17:51 PM IST

पावसाळ्यात कपडे जास्त वेळ ओलसर राहत असल्याने बुरशी लागते. म्हणूनच ओल्या कपड्यांचा कुबट वास येतो. 

 

1/8

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार , पावसाळ्यात ओले कपडे वापरल्याने फंगल इफेक्शन जास्त होतं. 

2/8

पावसाळ्यात त्वचारोग होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, बाहेरुन येताना कपड्यांवर चिखल उडतो. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं.   

3/8

पावसाळ्यात कपड्यांना येणारा घाण वास दूर करण्यासाठी, कपडे धुताना त्यात व्हिनेगर टाकावं. यामुळे कपड्यांची दुर्गंधी दूर होते.   

4/8

शक्य झाल्यास कपडे फॅनखाली न सुकवता सूर्यप्रकाशात सुकवावे त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येत नाही. 

5/8

कपडे धुताना त्यात अँटीसेप्टीक लिक्वीड टाकावं त्यामुळे कपड्यांवरचे जीव जंतू मरतात. 

6/8

बाहेरुन आल्यावर चिखलाने माखलेले कपडे गरम पाण्यात भिजून ठेवावेत त्यामुळे कपडे स्वच्छ धुतले जातात.   

7/8

कपाटाच्या कोपऱ्यात डांबराच्या दोन ते तीन गोळ्या ठेवा त्यामुळे कपड्यांना कुबट वास येत नाही.   

8/8

सुकलेल्या कपड्यांवर कापूर किंवा निलगिरीच्या तेलाचे काही थेंब शिंपडा त्यामुळे कपड्यांचा दुर्गंध दूर होतो.