'ती' सुंदर राणी जिने युद्धात युक्रेनला मदत करत पाठवला एक प्रेमळ संदेश; लग्नाआधी होती पत्रकार

अजूनही काही देश आहेत जिथे राजेशाही सुरु आहे. त्यात स्पेन हा देश देखील सहभागी आहे. स्पेनची राणी लेटिसिया ही खूप सुंदर आणि ग्लॅमरस असून तिचं करिअर, 2 लग्न आणि युक्रेनला ला पाठवण्यात आलेल्या विशेष संदेशाला घेऊन चर्चेत होती. 

Diksha Patil | Jan 27, 2025, 18:27 PM IST
1/7

स्पेनचे राजा फेलिप आणि त्यांची पत्नी राणी लेटिसियानं रशिया आणि युक्रेनच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा दिला. त्यासोबत यूक्रेनला मदत देखील केली. त्या दरम्यान, राणी लेटिसियानं केलेल्या एका गोष्टीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. 

2/7

युद्ध सुरु झाल्यानंतर स्पेननं युक्रेनला शस्त्र आणि अनेक गोष्टींनी मदत केली. त्यावेळी सैनिकांनी स्पेननं दिलेल्या ग्रेनाइडचा वापर केला. त्यावेळी त्या बॉक्समध्ये त्यांच्यासाठी एक भावूक होऊल लिहिलेलं एक पोस्टकार्ड मिळालं. त्यात असं लिहिण्यात आलं की 'मी तुमच्या विजयासाठी प्रार्थना करते! लेटिसिया With Love...'लेटेसियानं लिहिलेल्या या पत्रामुळे युक्रेनच्या सैनिकांना हिंम्मत मिळाली. राणीच्या या मेसेजनं सगळ्यांची मने जिंकली.

3/7

स्पेनची राणी लेटिसिया ऑर्टिज रोकासोलानोचं आयुष्य चांगलच चर्चेत होतं. ती एका सर्वसामान्य कुटुंबातून होती आणि लग्नाआधी ती एक पत्रकार होती. मॅड्रिडमध्ये तिनं पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि अनेक वर्तमानपत्रांमध्ये, इलेक्ट्रिक मीडियामध्ये तिनं काम केलं. 

4/7

राणी लेटिसियानं एक पत्रकार म्हणून अमेरिकीची निवडणूक ते इराकमध्ये युद्धापर्यंत सगळ्या गोष्टींचं कव्हरेज केलं. तिला मॅड्रिड प्रेस असोसिएशन पुरस्कार देखील मिळाला आहे. 

5/7

लेटिसियाचं पहिलं लग्न हे 1998 मध्ये झालं होतं. पण हे लग्न फक्त एक वर्ष टिकलं. त्यानंतर 2002 तिच्या आयुष्यात किंग फेलिप आले. त्यावेळी फेलिप हे उत्तर पश्चिम स्पेनची रियासत ऑस्टुरियसचे प्रिन्स होते. त्या दोघांची भेट ही मॅड्रिडमध्ये न्यूज अ‍ॅंकर पेड्रो एर्कुसियाकडून आयोजित करण्यात आलेल्या डिनरपार्टीत भेटले होते. त्यानंतर दोघं एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते आणि तिला सर्वसामान्य मुलीपासून थेड राणी बनवलं. 

6/7

प्रिंस फेलिपचे वडील किंग जुआन कार्लोसनं लेटिसिया ऑर्टिजच्या आधीच्या घटस्फोटाकडे दुर्लक्ष करत लग्नाला मंजूरी दिली. त्यानंतर 2004 लेटिसिया आणि फेलिपची लग्न झालं. त्यानंतर बरोबर 10 वर्षांनंतर 2014 मध्ये ते दोघे किंग आणि क्वीन झाले. 

7/7

लेटिसिया आणि फेलिप यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी लियोनोर ही ऑस्टुरियसची राजकुमार आहे तर दुसरी मुलगी इन्फेंटा सोफिया आहे.