विस्मरणात गेलेला दिवाळीचा पदार्थ; पारंपारिक तांदळाच्या पिठाच्या ढेबऱ्या, पाहा कृती

दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते. 

Mansi kshirsagar | Oct 25, 2024, 17:53 PM IST

Diwali 2024: दिवाळी म्हटलं की पदार्थांची लगबग सुरू होते. राज्यात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळीचा फराळ वेगवेगळा बनवण्यात येतो. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम मराठवाडा येथील फराळाची चव वेगवेगळी असते. 

1/7

diwali 2024 traditional food recipe dhebra

फराळ म्हटलं की, चकली, चिवडा, शंकरपाळे, अनारसे, करंजी, लाडू, शेव, नानखटाई असे पदार्थ डोळ्यांसमोर येतात. पण असे काही पदार्थ आहेत जे आता विस्मरणात गेले आहेत. 

2/7

diwali 2024 traditional food recipe dhebra

विस्मरणात गेलेल्या पदार्थांपैकीच एक आहे म्हणजे ढेबऱ्या. हा पदार्थ तांदळाच्या पिठापासून तयार केला जातो. आता फारच कमी ठिकाणी हा पदार्थ बनवला जातो. 

3/7

diwali 2024 traditional food recipe dhebra

कोकणात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जायची. दिवाळीच्या काही दिवसांआधी घरात धान्य येते. पूर्वी दिवाळीच्या दिवसात धान्याचा पदार्थ केला जायचा. पूर्वी घराघरात भातशेती केली जायची. 

4/7

diwali 2024 traditional food recipe dhebra

जसं जसं शेतीचे प्रमाण कमी होत गेले तसा हा पदार्थही विस्मरणात गेला. आता फारच कमी ठिकाणी हा पदार्थ केला जातो. तांदळाच्या ढेबऱ्या या पदार्थाची रेसिपी व कृती जाणून घ्या.

5/7

साहित्य

diwali 2024 traditional food recipe dhebra

तांदळाचे पीठ, गूळ, छोटा चमचा तूप (मोहनासाठी), तेल तळण्यासाठी.

6/7

कृती

diwali 2024 traditional food recipe dhebra

प्रथम एका भांड्यात पाण्यात अर्धी वाटी गुळ घालून ते गरम करुन घ्या.  पाणी गरम होताना त्यात एक चमचा तूप अथवा तेल घालावे

7/7

diwali 2024 traditional food recipe dhebra

पाण्यात मावेल एवढे तांदळाचे पीठ (पुरीचे पीठ भिजवतो तसे जरा घट्ट) भिजवावे. पीठ भिजवून  त्याच्या छोट्या पुऱ्या लाटून तळाव्यात. चमचमीत ढेबऱ्या तयार.