Diwali 2024: दिवाळीपूर्वी घरात लावा ही 5 रोपं, लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक अडचणी होतील दूर

यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्यासाठी सर्वजण उत्साहित आहेत. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. यावर्षी 29 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला अशा काही रोपांबद्दल सांगणार आहोत जी रोप तुम्ही दिवाळीच्या पूर्वी घरी आणलीत तर  लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील. 

| Oct 25, 2024, 17:14 PM IST
1/6

क्रसुला प्लांट :

वास्तु शास्त्रनुसार घरात क्रसुला हे प्लांट लावल्याने धनाची देवता लक्ष्मी देवीचे घरात आगमन होईल आणि घराची आर्थिक स्थिती सुधारेल. अशी मान्यता आहे की हे रोप धनाला आकर्षित करते. सोबतच यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता येते. 

2/6

मनी प्लांट :

हिंदू धर्मात मनी प्लांट लावणं शुभ मानलं जातं. मणी प्लांट घरी लावल्याने घरात धन आणि समृद्धी येते. मनी प्लांट हे घरातील हवा शुद्ध ठेवण्याचे सुद्धा काम करते. असं म्हणतात जिथे या झाडाची चांगली निगा आणि काळजी घेतली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतो. 

3/6

पांढरे पळसाचे झाड :

जर घरातील एखादी व्यक्ती ही खूप दिवसांपासून एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर अशावेळी पांढरे पळसाचे झाड लावणे लाभदायक ठरते. धार्मिक मान्यतेनुसार हे झाड लक्ष्मी देवीचे प्रतीक आहे. या झाडाला फुल अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. 

4/6

स्नेक प्लांट :

 वास्तु शास्त्रनुसार घरात स्नेक प्लांट लावणे खूप लाभदायक ठरते. हे झाड तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्याजवळ लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकता येते. व्यवसाय आणि कामात यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही हे रोप लावू शकता.

5/6

तुळस :

धार्मिक मान्यतेनुसार तुळशीचं रोप हे भगवान विष्णूंना प्रिय असते. ज्या घरात तुळशीचं रोप लावलं जातं तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो ज्यामुळे आर्थिक स्थिती सुद्धा सुधारते. म्हणून दिवाळीपूर्वी घरी तुळशीचे रोप आणावे असे म्हंटले जाते. 

6/6

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)