तुरुंगात गेले, प्रसिद्धीसाठी बदलला धर्म; मधुबालासोबत नातं तुटल्यावर 22 वर्षीय लहान अभिनेत्रीशी केलं लग्न

Dilip kumar Death Anniversary : फोटोमधील चिमुकला बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग नावाने ओळखला जातो. आज ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या अभिनयाने ते चाहत्यांचा मनात जिवंत आहेत. आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्याबद्दल. त्यांची आज पुण्यतिथी आहे.  

नेहा चौधरी | Jul 07, 2024, 10:46 AM IST
1/9

एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देणाऱ्या या ज्येष्ठ अभिनेत्याने 7 जुलैला 2021 मध्ये वयाच्या 98 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. चित्रपटसृष्टीतील करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे ते कायम चर्चेत राहिले. 

2/9

'द सबस्टन्स अँड द शॅडो' या आत्मचरित्रात असं लिहिलं गेलंय की, वडिलांसी भांडण झाल्यानंतर ते कामाच्या शोधात पुण्यात आले. दीर्घकाळ मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर्स क्लबमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं. असं म्हणतात की, दिलीप कुमार यांच्या हातच कॅन्टीनमध्ये बनवलेले सँडविच लोकांना खूप आवडायच. 

3/9

तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, दिलीप कुमार यांची जेलवारीही झाली आहे. एकदा भाषण करताना ते म्हणाले होते की, 'भारताचा ब्रिटिशांविरुद्धचा लढा अगदी योग्य असून ब्रिटिश राज्यकर्ते चुकीचे आहेत.' हे ऐकून इंग्रजांनी त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात केली.

4/9

दिलीप कुमार यांचे खरं नाव युसूफ खान होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, त्यावेळी भारतात हिंदू-मुस्लिम भेद खूप होते. त्यामुळे अभिनय शिकत असताना बॉम्बे टॉकीजची मालकीण देविका राणी यांना दिलीप कुमार यांना लाँच करायचं होतं. त्यांनी युसूफ खान हे नाव बदलून दिलीप कुमार करायला सांगितलं. 

5/9

दिलीप कुमार आणि देवानंद हे अतिशय घनिष्ट मित्र होते. पण सुरैया आणि देवानंद यांचं नातं हे दिलीप कुमार यांच्यामुळे संपुष्टात आलं आणि त्यानंतर या दोघांच्या मैत्रीतही अंतर आलं.   

6/9

दिलीप कुमार यांचं वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ उतार होते. मीडिया रिपोर्टनुसार मधुबाला आणि दिलीप कुमार यांचं प्रेम होतं. पण काही कारणामुळे हे नात संपलं आणि त्यानंतर त्यांचं नाव वैजयंती मालाशी जोडलं गेलं.   

7/9

दिलीप कुमार यांचे आजही असंख्य चाहते आहेत. पण एक अशी चाहती होती जी 12 वर्षांची असल्यापासून त्यांच्याशी लग्न करायचे स्वप्न पाहत होती. ही मुलगी होती सायरा बानो आणि तिचं हे स्वप्नही पूर्ण झालं. 22 वर्ष लहान अभिनेत्रीशी लग्न केलं म्हणून दिलीप कुमार अचानक चर्चेत आले होते. 

8/9

तुम्हाला माहितीय का दिलीप कुमार यांना ट्रॅजेडी किंग का म्हणतात? ते असं झालं की, एक काळ असा होता जेव्हा दिलीप कुमार यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेक गंभीर आणि दुःखद भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर त्यांना ट्रॅजेडी किंग ही पदवी मिळाली.

9/9

दिलीप कुमार यांचं सारा अली खानशी खास नातं आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. साराची आजी आणि अमृता सिंगची आई रुखसाना सुलताना दिलीप कुमार यांच्या कुटुंबाशी संबंध आहे. साराने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिचे दिलीप कुमार यांच्यासोबत तिच्या आईपासून नातेसंबंध आहे.