PHOTO : धोनी आणि साक्षी बालपणीचे मित्र? बायोपिकपेक्षा वेगळी लव्हस्टोरी? निवृत्तीनंतरही कसा कमावतो करोडो रुपये?

MS Dhoni Net Worth : महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' यामध्ये माहीचं क्रिकेट विश्व आणि वैयक्तिक आयुष्यासोबत लव्हस्टोरी दाखविण्यात आलीय. पण खऱ्या साक्षी आणि धोनीची लव्ह स्टोरी हटके आहे. शिवाय कॅप्टन कूलने निवृत्ती घेतल्यानंतरही आज तो करोडो रुपये कसा कमवतोय. 

| Jul 07, 2024, 09:27 AM IST
1/13

दोन वेळा वर्ल्डकप जिंकणारा भारतीय माजी कर्णधार एमएस धोनीने आपला 43 वा वाढदिवस सलमान खान आणि साक्षीसोबत साजरा केला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी धोनी साक्षीसोबत मुंबईत आहे. 

2/13

'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' मध्ये माही आणि साक्षीची लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे. आज आपण यांची खरी लव्ह स्टोरी जाणून घेऊयात. 

3/13

मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, धोनी आणि साक्षी यांचे वडील रॉचीमध्ये मेकॉनमध्ये कामाला होते. त्यामुळे हे दोघे एकमेकांना लहानपणीपासून ओळखतात. शिवाय माही आणि धोनी एकाच शाळेत होते. पण नंतर साक्षीचे कुटुंब डेहराडूनला शिफ्ट झाले. 

4/13

चित्रपटात दाखवण्यात आलं की, माही साक्षीला एका हॉटेलमध्ये भेटो. हे अगदी खरं आहे. तब्बल 10 वर्षांनंतर धोनी आणि साक्षी एका हॉटेलमध्ये भेटतात. चित्रपटात दाखवल्यानुसार कोलकातामध्ये सामना खेळण्यासाठी गेलेली टीम इंडिया ताज बंगाल हॉटेलमध्ये मुक्कामी होती. साक्षी तिथे इंटर्नशिप करत होती. जिथे दोघे पुन्हा एकदा समोरासमोर आले. साक्षीचे मॅनेजर युधाजित दत्ता यांनी तिची धोनीशी ओळख करून दिली.

5/13

त्यानंतर धोनीने युधाजीतकडे साक्षीचा नंबर मागितला होता. त्यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर त्या मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं. 

6/13

पण साक्षीला लहानपणीच्या मैत्रीबद्दल विचारलं असता, तिने या गोष्टीच खंडन केलंय. साक्षीने एका मुलाखतीत सांगितलं की, 'आमच्या दोघांमध्ये 7 वर्षांचा फरक आहे. मग आम्ही लहानपणीचे मैत्री कसे असू शकतो. मात्र ही अफवा का पसरली मला माहिती नाही.'

7/13

धोनीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर मीडिया रिपोर्टनुसार माहीची एकूण संपत्ती ही 1040 कोटींच्या घरात आहे. तो धोनी ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो. 

8/13

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही, माजी भारतीय कर्णधार धोनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहे. माही चेन्नई फुटबॉल क्लब चेन्नईयिन एफसी, रांची हॉकी क्लब रांची रेज सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशीप टीम माही रेसिंग टीम इंडियाचे सह मालक आहे. 

9/13

धोनीचा दरवर्षी पगार 50 कोटी आणि दर महिना 4 कोटी रुपये आहे. निवृत्तीनंतर त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे इंडियन प्रीमियर लीग आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज आणि अनेक ब्रँड्सचे प्रतिनिधित्व करतो.

10/13

चेन्नई सुपर किंग्जने 4 आयपीएल विजेतेपद पटकवलंय. 2024 पर्यंत, 17 हंगाम खेळल्यानंतर धोनीची आयपीएल कमाई सुमारे 188.8 कोटी रुपये आहे. 

11/13

धोनी एअरसेल, पेप्सी, ओरिएंट पीएसपीओ, स्पार्टन स्पोर्ट्स, रिबॉक, बूस्ट, एमिटी युनिव्हर्सिटी, गल्फ ऑइल, आम्रपाली ग्रुप, अशोक लेलँड, मॅकडोवेल्स सोडा, बिग बाजार, एक्साइड बॅटरीज, टीव्हीएस मोटर्स, सोनी ब्राव्हिया, सोनाटा वॉचेस यांचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे.

12/13

 डाबर च्यवनप्राश, लेज वेफर्स, लाफार्ज कस्टमर सर्व्हिस आणि मॅक्स मोबाईल यांचीही नावे आहेत. याशिवाय धोनी ओरियो, ड्रीम 11, लावा, स्पार्टन स्पोर्ट्स, गल्फ ऑइल इंडिया, रिबॉक, एक्साइड, अनॅकॅडमी, ओरिएंट, एअरसेल, सोनाटा, इंडिया सिमेंट्स, विंजो, वॉर्डविज, मास्टरकार्ड इंडिया, सुमधुरा अशा अनेक ब्रँडला मान्यता देतो.

13/13

एमएस धोनीकडे एक अप्रतिम कार आणि बाइकच कलेक्शन आहे. ज्यात Hummer H2, AudiQ7, Land Rover, Ferrari 599GTO, NissanJonga, Mercedes Benz GLE, Rolls Royas, Silver Shadow सारख्या कारचा समावेश आहे. बाइक्समध्ये Kawasaki Ninja H2, Harley Davison FatBoy, Ducati 1098 आणि Yamaha RD 350 यांचा समावेश आहे.