केदारनाथमध्ये पुन्हा प्रकोप! ढगफुटीमुळे 200 भाविक अडकले; चारधाम यात्रा रद्द

केदारनाथमध्ये ढगफुटी मागचं कारण काय? चारधाम यात्रा रद्द करण्याचा निर्णय 

| Aug 01, 2024, 07:06 AM IST

Kedarnath Cloudburst: उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. केदारनाथमध्ये (Kedarnath)ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

1/7

200 भाविक अडकले

केदारनाथचा चालण्याचा जो मार्ग आहे, तेथे ढगफुटी झाल्याचं सांगण्यात येत आहे. एवढंच नव्हे तर ढगफुटीसोबतच लँडस्लाइड देखील झाली आहे. दगडी ढिगाऱ्यांमुळे सुमारे 30 मीटर चालण्याच्या मार्गाचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पादचारी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमबली येथे सुमारे 150 ते 200 यात्रेकरू अडकले आहेत. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

2/7

मुसळधार पावसामुळे हरिद्वार जलमय

हरिद्वारमध्ये बुधवारी सायंकाळी थोडा उशिरा मुसळधार पाऊस पडल्यानंतर संपूर्ण शहर जलमय झाले होते. कोरडी नदी पाण्याने भरल्याने कावड घेऊन जाणारी वाहने वाहून गेली. अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेले होते. कानखल पोलीस ठाण्यातही पावसाचे पाणी शिरले. पावसामुळे भूपतवाला, हरिद्वार, न्यू हरिद्वार, कंखल, ज्वालापूर येथील अनेक वसाहती आणि बाजारपेठांची दुरवस्था झाली असून, सर्वत्र जलमय झाले आहे.

3/7

उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट

प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील 48 तासांत उत्तराखंडमधील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. हा इशारा मंगळवारी रात्रीपासून लागू झाला आहे. डेहराडून, टिहरी, पौरी, नैनिताल, हरिद्वार, उधम सिंह नगर आणि चंपावत जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

4/7

शाळा बंद कराव्या लागल्या

डेहराडून, नैनिताल आणि उधम सिंग नगरमध्ये 31 जुलै रोजी एक दिवसासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. डेहराडून जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांनुसार, मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या सर्व सरकारी आणि खाजगी शाळा आणि अंगणवाडी केंद्रे बुधवारी बंद राहतील.

5/7

भूस्खलन टाळण्यासाठी

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अतिवृष्टीसाठी जारी केलेल्या ऑरेंज अलर्टमुळे डेहराडूनच्या शाळा आणि अंगणवाडी केंद्रे २६ जुलै रोजी बंद ठेवण्यात आली होती. या बंदमध्ये पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व सरकारी आणि खासगी संस्थांचा समावेश होता. सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि खराब हवामानात भूस्खलनासारख्या घटना टाळण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

6/7

चार धाम यात्रा स्थगित

खराब हवामानामुळे चार धाम यात्रा आजसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.म्हणजेच हरिद्वार आणि ऋषिकेशमधील नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात परिस्थिती बिकट झाली आहे.  हवामान खात्यानेही अलर्ट जारी केला आहे.

7/7

ढगफुटी कशामुळे

बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे बुधवारी उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्ली-एनसीआरसह उडघत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. उत्तराखंडमधील टिहरी आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले आहे.