असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.

Intern | Dec 26, 2024, 15:21 PM IST
1/7

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर

हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंबाने याही वर्षी ख्रिसमस मोठ्या थाटामाटात साजरा केला. नीतू कपूरपासून ते आलिया भट्टपर्यंत सर्वांनी इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. एक फोटोमध्ये, रणबीर कपूर आलिया आणि आपली मुलगी राहासोबत पोज देताना दिसत आहे.  

2/7

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांचे ख्रिसमस सेलिब्रेशनही खूप आनंदात साजरी केले. बिपाशाने तिची मुलगी देवी आणि पती करण सोबत काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यावर फॅन्सने भरभरून प्रेम व्यक्त केलं आहे.

3/7

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यासाठी यावर्षीचा ख्रिसमस खूप खास होता. कारण ते पालक झाले आहेत. त्यांनी त्यांच्या मुलगी दुआच्या नावाचा ख्रिसमस बॉल्सचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्यांचे चाहते त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत.  

4/7

कतरिना कैफ आणि विकी कौशल

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस मोठ्या आनंदाने साजरा केला. दोघांनी इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ते कतरिनाच्या कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहेत.

5/7

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी या ख्रिसमसला रोमँटिक पद्धतीने साजरा केला. त्यांनी एक क्यूट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

6/7

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा

शिल्पा शेट्टीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये सांताक्लॉज त्यांच्या घरात पोहोचले आहेत. शिल्पा आणि तिच्या मुलांना सांताने भेट दिली आणि मुलांचा आनंद स्पष्ट दिसत होता. याच वेळी शिल्पा तिच्या कुटुंबासोबत हा सण साजरा करताना देखील दिसली.  

7/7

वरुण धवन आणि नताशा दलाल

वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्यासाठी यावर्षीचा ख्रिसमस खास होता, कारण ते आपल्या मुलीसोबत पहिला ख्रिसमस साजरा करत आहेत. वरुणने इन्स्टाग्रामवर पत्नी नताशा, मुलगी लारा आणि कुत्र्यासोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सध्या वरुणचा 'बेबी जॉन' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्यासाठी तो चर्चेत आहे.    या सेलिब्रिटींच्या ख्रिसमस सेलिब्रेशन्समुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.