1/7
PHOTO: महापौर बंगल्यातील बाळासाहेबांच्या स्मारकावर 1810000000 रुपयांचे काम पूर्ण, पाहा पहिली झलक
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे. याशिवाय, प्रवेशव्दार इमारत, प्रशासकीय इमारत, आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे.
2/7
या प्रकल्पाच्या टप्पा-1 च्या कामाची एकूण किंमत ₹180.99 कोटी इतकी आहे. टप्पा 1 अंतर्गत महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युत कामे पूर्ण करून, इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
3/7
या प्रकल्पाच्या टप्पा-1 अंर्तगत एक इंटरप्रिटेशन सेंटर देखील बांधण्यात आले आहे, ज्याचे क्षेत्रफळ अंदाजे 1530.44 चौ. मी. आहे. हे सेंटर भूमिगत स्वरूपात असून, तळघरात कलाकार दालन, संग्राहालय, ग्रंथालय या दालनांचा तसेच प्रसाधनगृह आणि देखभाल कक्ष यांचा समावेश आहे. प्रवेशद्वार इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे 3099.84 चौ. मी. आहे, ज्यात बहुउद्देशीय सभागृह, सुरक्षा नियंत्रण कक्ष, भूमिगत वाहनतळ (27 वाहने) आणि वाहनांसाठी दोन स्वतंत्र उद्वाहकांचा समावेश आहे.
4/7
5/7
6/7