'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाचे बदल

ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Apr 01, 2024, 15:13 PM IST

Automobile World:ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. 

1/9

'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात झालेयत महत्वाचे बदल

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

Automobile World Changes:भारतामध्ये 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्षा सुरु होते. अशावेळी घरच्या सिलेंडरपासून ते रेल्वेच्या तिकिटापर्यंत अनेक महत्वाचे बदल झाले आहेत. दरम्यान ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. 

2/9

टोयोटो आणि किया कार महाग

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

भारतीय बाजारात टोयोटा आणि कियाच्या अनेक सेगमेंट कार ऑफर केल्या जात आहेत. 1 एप्रिल 2024 पासून या कारच्या किंमतीत वाढ केली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली होती. त्यामुळे या दोन्ही कंपनीच्या कार खरेदी करणं महाग झालंय. 

3/9

वाहन खरेदी महाग

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

दरम्यान टोयोटो आणि किया कार कंपनीकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दुसरीकडे टाटाची कर्मर्शियल वाहन खरेदीदेखील महाग झाली आहे. 

4/9

फेम 2 सब्सिडी झाली बंद

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

देशामध्ये इलेक्ट्रीक वाहनांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून फेम-2 सब्सिडी ऑफर केली जायची. पण 31 मार्च 2024 पासून ही सब्सिडी संपुष्टात आली आहे. एप्रिल 2024 पासून 500 कोटी रुपयांची इलेक्ट्रीक मोबिलिटी प्रमोशन स्किम (EMPS) सुरु केली जाणार असल्याची माहिती अवजड उद्योग मंत्रालयाने दिली आहे. 

5/9

5 हजार रुपये प्रति किलोवॉट तास

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

याअंतर्गत दुचाकी आणि तीन चाकी वाहन खरेदीचा चालना देण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2024 पासून इलेक्ट्रीक दुचारी वाहनांवर 10 हजार रुपये प्रति किलोवॉट तासऐवजी 5 हजार रुपये प्रति किलोवॉट तास सब्सिडी दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त 10 हजार रुपयापर्यंत अधिक सवलत दिली जाणार आहे. 

6/9

टोल महागला

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

देशात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवे सुरु करण्यात आले आहेत. ज्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठीचे अंतर कमी झाले आहे. यासाठी नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवेवर कारसाठी टोल टॅक्स घेतला जातो.

7/9

प्रवास करणं महागलं

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

पण 1 एप्रिलपासून देशातील काही महामार्गांवरील टोल वाढले आहेत. त्यामुळे स्वत:च्या गाडीतून नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवेवर प्रवास करणं महागलं आहे.

8/9

फास्टॅगची केवायसी

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवेवर प्रवास करताना टोल टॅक्स द्यावा लागतो. टोल टॅक्स हा फास्टॅगच्या माध्यमातून वसूल केला जातो. 1 एप्रिल 2024 पासून फास्टॅगचे नियम बदलले आहेत. 

9/9

फास्टॅग ब्लॅकलिस्ट

car prices to toll tax important changes automobile world from 1st April

फास्टॅगची केवायसी करण्यासाठी 31 मार्च 2024 ही अंतिम तारीख होती. पण ज्यांनी अद्याप हे काम केले नसेल त्यांना टोल टॅक्स पेमेंट करताना अडचण येऊ शकते. अनेक फास्टॅग ब्लॅकलिस्टदेखील होऊ शकतो.