कमी बजेटमध्ये बिनधास्त परदेशात साजरं करा नवीन वर्ष; भारताचे 'हे' 5 शेजारी देश अगदी स्वस्त

Budget Friendly Countries Near India: नववर्षं जसजसं जवळ येत आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण ते साजरं करण्यासाठी प्लॅन आखत आहे. अनेकांची परदेशात जाऊन नववर्षं साजरं करण्याची इच्चा असते. पण बजेटचा मुद्दा आल्यानंतर ते प्लॅन बारगळतात. जर तुमच्याही मनात परदेशात जाण्याची इच्छा असेल तर चिंता करण्याची गरज नाही. भारताजवळ असे अनेक देश आहेत जे आपली सुंदरता, संस्कृती यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. जाणून घ्या अशा पाच बजेट फ्रेंडली देशांबद्दल जिथे तुम्ही फक्त 50 हजार ते 1 लाखांमध्ये फिरु शकतात.   

Shivraj Yadav | Dec 09, 2024, 16:04 PM IST

1/6

2/6

श्रीलंका

श्रीलंका

श्रीलंकेला आयलँड ऑफ जेम्स (Island of Gems) म्हणूनही ओळखलं जातं. यासह तो भारताच्या अगदी जवळ आहे. हा देश आपले समुद्रकिनारे, प्राचीन मंदिरं आणि मनाला आराम देणाऱ्या हिरवळीसाठी ओळखला जातो. कोलंबो, कँडी आणि गॅले सारखी शहरे तुमची सहल संस्मरणीय बनवतील. येथे तुम्ही एला रॉक, सिगिरिया रॉक आणि याला नॅशनल पार्कला भेट देऊ शकता. भारतीयांना श्रीलंकेचा खर्च परवडणारा आहे. खासकरून जर तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थ आणि वाहतूक वापरत असाल तर खिशावर जास्त भार पडणार नाही.     

3/6

थायलंड

थायलंड

थायलंड भारतीय पर्यटांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. बँकॉक, फुकेत आणि पटाया सारखी पर्यटनस्थळं तुमच्या नवीन वर्षाचं सेलिब्रेशन आणखी विस्मरणीय बनवतील. येथे स्ट्रीट फूड, नाईट मार्केट्स आणि बीच पार्टीज आकर्षणाचं केंद्र असतात. थायलंडमध्ये भारतीयांसाठी व्हिसा ऑन अराइव्हल सहजपणे उपलब्ध आहे. येथे बजेट फ्रेंडली हॉटेल आणि हॉस्टेलही उपलब्ध आहेत.   

4/6

भूतान

भूतान

भूतानला 'आनंदाची भूमी' म्हटले जाते, जी शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे. भारतीय नागरिकांना येथे व्हिसाची गरज नाही, ज्यामुळे ते अधिक परवडणारे आहे. थिंफू, पारो आणि पुनाखा सारख्या ठिकाणी देत तुम्ही तेथील संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता. येथील स्थानिक खाद्यपदार्थ आणि बजेट गेस्टहाऊसमध्ये तुम्ही आरामात राहू शकता.  

5/6

व्हिएतनाम

व्हिएतनाम

जर तुम्हाला इतिहास, कला आणि संस्कृतीत रस असेल तर व्हिएतनाम हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. हो ची मिन्ह सिटी, हनोई आणि हा लॉन्ग बे सारखी ठिकाणे तुमचा दौरा संस्मरणीय बनवतील. व्हिएतनामचे स्थानिक अन्न आणि कमी किमतीच्या वाहतूक सेवांमुळे हे बजेट प्रवाशांसाठी स्वर्ग बनते.  

6/6

इंडोनेशिया

इंडोनेशिया

इंडोनेशिया, विशेषत: बाली हे नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एक स्वप्नवत ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारे, मंदिरं आणि धबधबे तुम्हाला वेड लावतील. बालीमध्ये अनेक बजेट रिसॉर्ट्स आणि होमस्टे सहज सापडतात. याशिवाय स्थानिक खाद्यपदार्थ ट्राय करायला विसरू नका.