Health Tips : धकाधकीच्या आयुष्यात पोलादी हाडं पाहिजेत? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.

| Feb 12, 2024, 21:41 PM IST

Foods For Healthy Bones : हाडं मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन डी यासह अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य आहार गरजेचा असतो.

1/6

आहारतज्ज्ञ म्हणतात...

धकाधकीच्या आयुष्यात तुमची हाडं तर मजबूत ठेवायची असतील तर काय केलं पाहिजे? यावर आहारतज्ज्ञ प्रियांका जयस्वाल यांनी दिली आहे.

2/6

पालक

पालकामध्ये कॅल्शियम चांगल्या प्रमाणात आढळते. जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायची असतील तर तुमच्या आहारात कॅल्शियमचा समावेश करणे फायद्याचे असते. सर्वात महत्वाचं म्हणजे पालक खाल्ल्याने हाडांना 25 टक्के कॅल्शियम मिळते.

3/6

दही

दहीमध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. दुधापेक्षा जास्त दही खाल्ल्यास कॅल्शियम जास्त मिळते. त्यामुळे हाडांच्या समस्यांपासून सुटका मिळवायची असल्यास आहारात दुधाचा समावेश करावा.

4/6

अननस

अननसमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याशिवाय अननसामध्ये पोटॅशियम देखील जास्त प्रमाणात आढळते.

5/6

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई सोबतच प्रथिने, झिंक आणि कॅल्शियम देखील बदामामध्ये चांगल्या प्रमाणात आढळतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते बदाम केवळ मेंदूच तीक्ष्ण बनवत नाही तर हाडेही मजबूत करतो.

6/6

कॅल्शियम

कॅल्शियम शरिरातील हाडांच्या चांगल्या विकासासाठी फार महत्वाचं आहे. जर शरीरात  कॅल्शियमची कमतरता असेल वाढत्या वयात सांधेदुखी, हाडाचे इतर विकार उद्भवू शकतात.