पृथ्वीवरील सर्वात महागडी इमारत! नाव सांगायची गरज नाही, फोटो पाहूनच ओळखाल

जगातील टॉप 5 महागड्या इमारती कोणत्या जाणून घेऊया. 

| Jan 07, 2025, 22:43 PM IST

Most Expensive Building In The World :भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे अँटिलिया (Antilia) हे निवासस्थान भारतातील सर्वात महागडी इमारत आहे. पण जगातील सर्वात महागडी इमारत कोणती जाणून घेऊया. 

 

1/8

बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. मात्र, याच बुर्ज खलिफाला टक्कर देते जगातील सर्वात महागडी इमारत. 

2/8

पृथ्वीवरील सर्वात महागड्या इमारतींच्या यादीत असलेल्या इमारती या जगभरात प्रसिद्ध आहे. 

3/8

अमेरिकेतील दि कॉस्मोपॉलिटन इमारत जगातील पाचवी महागडी इमारत आहे. याची किंमत 312.04 अब्ज रुपये आहे.  

4/8

अॅपलचे मुख्यालय जगातील चौथी महागडी इमारत आहे. अॅपल पार्क म्हणून ओळखल्या जाणार्‍या या इमारतीची किंमत 354.60 अब्ज रुपये इतकी आहे.

5/8

सिंगापूरमधील मरीन बे सँड्स तिसरी सर्वात महागडी इमारत आहे.  याची किंमत 425.52 अब्ज रुपये आहे.

6/8

मक्कामध्ये स्थित अबराज अल बेयत टॉवर्स जगातील सर्वात महागड्या इमारतीच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. याची किंमत 1134.72 अब्ज रुपये आहे.

7/8

 मक्कामधील मस्जिद अल-हारम ही धार्मिक वास्तू आहे.  या इमारतीची किंमत जवळपास 7092 अब्ज रुपयांपेक्षा जास्त आहे.

8/8

सौदी अरेबियाच्या मक्कामधील मस्जिद अल-हारम ही पृथ्वीवरील सर्वात महागडी इमारत आहे.