13 वर्षात फक्त 2 हिट चित्रपट, बॉलिवूडच्या फ्लॉप अभिनेत्रीने 50 लाख नेटवर्थ असणारा जोडीदार निवडला, तुम्ही ओळखलं का?

इंडस्ट्रीमध्ये अशी एक अभिनेत्री आहे, जिने 13 वर्षांमध्ये फक्त 2 हिट चित्रपट दिलेत. तरी देखील तिचे नाव टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

Dec 22, 2024, 15:21 PM IST
1/7

फिल्म इंडस्ट्री

फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. परंतु, यामध्ये काहींना यश मिळाले तर काही इंडस्ट्रीमधून गायब झाले.   

2/7

परिणीती चोप्रा

आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिचे नाव परिणीती चोप्रा आहे. अभिनेत्री तिच्या करिअरमध्ये फक्त 2 हिट चित्रपट दिले आहेत. 

3/7

जोडीदार

आज देखील परिणीती चोप्राचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. खास गोष्ट म्हणजे तिने एका महिन्यात जेवढी कमाई केली तेवढीच संपत्ती असलेला जोडीदार तिने निवडला. 

4/7

इंडस्ट्रीपासून दूर

परिणीती चोप्राने 2011 मध्ये करिअरला सुरुवात केली. तिने 15 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. ज्यामध्ये यातील बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले. सध्या अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दूर आहे. 

5/7

900 कोटींचा चित्रपट

नुकताच अभिनेत्रीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, जगभरात 900 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या चित्रपटासाठी पहिली पसंती तिच्या नावाला होती. 

6/7

अॅनिमल

या चित्रपटाचे नाव 'अॅनिमल' आहे. 2023 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. 

7/7

राघव चढ्ढा

परिणीतीने 2023 मध्ये खासदार राघव चढ्ढा यांच्याशी लग्न केले. रिपोर्टनुसार, राघव चढ्ढा यांची एकूण संपत्ती 50 लाख रुपये आहे. तर अभिनेत्री एका महिन्यात 40 लाखांपेक्षा जास्त कमावते.