Weekly Horoscope : 'या' वर्षातील शेवटचा आठवडा 5 राशींसाठी वरदान! प्रगतीसोबत आर्थिक भरभराटी
Weekly Horoscope 23 to 29 december 2024 in Marathi : या वर्षातील आणि डिसेंबर, मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा आठवड्यात संपत्तीचा कारक कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत शनिदेव विराजमान आहे. त्यामुळे कुंभ राशीत शुक्र आणि शनिचा संयोग जुळून येणार आहे. या संयोग करिअरच्या दृष्टीने आर्थिक प्रगती आणि संपत्तीचा वाढ होणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून
1/12
मेष (Aries Zodiac)
डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक सिद्ध होणार आहे. तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे शुभ संकेत आहेत. भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहे. या आठवड्यात तुम्हाला महत्त्वाच्या सहलीला जावं लागणार आहे. महिलेच्या आशीर्वादाने तुम्हाला जीवनात सुख-शांती लाभणार आहे. नोकरीच्या ठिकाणीही प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. शुभ दिवस: 23,25,27
2/12
वृषभ (Taurus Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी, कामाच्या ठिकाणी एखादा नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ परिणाम मिळणार आहे. जर तुम्ही कामाच्या जीवनात संतुलन राखले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून तुम्हाला यश लाभणार आहे. या आठवड्यात खर्च जास्त होणार आहे. याकडे दुर्लक्ष करु नका. सप्ताहाच्या शेवटी तुम्ही तुमच्या जीवनात समाधानी असणार आहात. व्यवसायात काही नवीन करायचे असेल तर हा आठवडा शुभ असणार आहे. शुभ दिवस: 24,26,27
3/12
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक लाभ आणि प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात विचारपूर्वक कोणताही निर्णय घेतल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात करण्याबाबत मन साशंक असणार आहे. आर्थिक खर्चही या आठवड्यात वाढणार आहे. तुमचे न्यायालयीन खटलेही मार्गी लागणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीबद्दल चिंता असणार आहे. या आठवड्यात केलेले प्रवास तुमच्यासाठी प्रगतीचा असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपल्या प्रियजनांसोबतचे संबंध सुधारणार आहे. मुलांकडूनही तुम्हाला आनंद मिळणार आहे. शुभ दिवस: 27
4/12
कर्क (Cancer Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. आक्रमक व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्येही पैशाचा ओघ वाढणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या चांगल्या भविष्यासाठी काही ठोस निर्णय घेणार आहात. तुमच्या प्रेम जीवनात सुखद अनुभव येणार आहेत. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात सहलींदरम्यान खूप मालकी असणे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरणार आहे. जर तुम्ही आरामात प्रवास केलात तर तुम्हाला आनंद मिळणार आहे. शुभ दिवस: 23,25
5/12
सिंह (Leo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभ आणि आर्थिक बाबतीत प्रगतीचा सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी भावनिक कारणांमुळे अडचणी वाढणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्चही जास्त असणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असणार असून, तरच शांतता राहणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. कुटुंबातील लोक पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र सप्ताहाच्या शेवटी परिस्थितीत सुधारणा होणार आहे. शुभ दिवस: 27
6/12
कन्या (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय आनंददायी असणार आहे. तुमच्यासाठी उत्तम प्रगतीची हा आठवडा असणार आहे. तुम्ही वीकेंडला कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करणार आहात. प्रवासातून सुख-समृद्धीचे शुभ संयोग निर्माण होणार आहे. प्रवास गोड आठवणींनी भरून जाणार आहे. आर्थिक बाबतीत सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुमच्या तब्येतीत बरीच सुधारणा होणार आहे. कामाच्या ठिकाणी ज्यांची आर्थिक स्थिती चांगली राहणार असून आर्थिक समस्या दूर होणार आहे. आठवडाअखेरीस चर्चेद्वारे कोणताही गोंधळ सोडवला तर बरे परिणाम होणार आहे. शुभ दिवस: 24,25,26
7/12
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत प्रगतीचा ठरणार आहे. आर्थिक दृष्टीकोनातून काळ अनुकूल राहणार आहे. धनाच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती राहणार आहे. महिलेच्या मदतीने संपत्तीत वाढ होणार आहे. तुमच्या तब्येतीत बरीच सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक आरोग्यविषयक क्रियाकलापांचे पर्याय समजणार आहे. त्यांची अंमलबजावणी केल्यास शुभ परिणाम मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून निर्णय घेतल्यास तुम्हाला यश मिळणार आहे. प्रेम संबंधांसंबंधी काही बातम्या ऐकून तुम्हाला वाईट वाटण्याची शक्यता आहे. सहली पुढे ढकलणे चांगले परिणाम मिळतील. शुभ दिवस: 23,24
8/12
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभ आणि आर्थिक बाबतीत प्रगतीचा सिद्ध होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या प्रवाशांच्या भल्यासाठी काही ठोस निर्णय घेणार आहात. कुटुंबातील एखाद्याच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटणार आहे. खर्चासोबतच तुम्हाला बरीच धावपळ करावी लागणार आहे. आर्थिक बाबतीत पैसा येईल पण कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून करा. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. आठवड्याच्या शेवटी, भावनिक कारणांमुळे त्रास होईल आणि तुम्ही खूप अस्वस्थ असणार आहात. शुभ दिवस: 24,26
9/12
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाचा ठिकाणी प्रगती असणार आहे. वडिलांच्या मदतीने त्यांना जीवनात आनंद आणि शांती लाभणार आहे. आर्थिक बाबतीत कोणताही निर्णय मनाचे ऐकूनच घ्या. आरोग्याच्या दृष्टीने सर्व काही ठीक राहणार आहे. मात्र मन एखाद्या गोष्टीबद्दल असमाधानी राहणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये धाडसी निर्णय घेतल्याने तुमच्यासाठी शुभ परिणाम . आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही कायदेशीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: 24
10/12
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने फायदा होणार असून तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामनाही करावा लागणार आहे. सासरच्यांकडून मान-सन्मान मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायातही रस असणार असून तुमची प्रलंबित कामे पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक करायची असेल तर ते जरूर करा, भविष्यात फायदा होणार असून तुमचे काम पूर्ण होणार आहे. शुभ दिवस: 29
11/12
कुंभ (Aquarius Zodiac)
या आठवड्यात या राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगतीच्या शुभ संधी मिळून आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आश्वासने या आठवड्यात पूर्ण होताना दिसत नाहीत आणि चिंताही वाढणार आहे. तुम्हाला कुटुंबातील महिलांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवणार आहात. या आठवड्यात प्रवासातूनही शुभ परिणाम मिळणार आहे. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न शेवटी तुमच्यासाठी शुभ परिणाम देणार आहे. आठवड्याच्या शेवटी, चांगली परिस्थिती निर्माण होणार असून काही नवीन सुरुवातीमुळे तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती असणार आहे. शुभ दिवस: 25,26,27
12/12