कोणत्या देशातील सैनिकांचा पगार 1,00,00,000 रुपये? युद्ध लढत नाहीत, तरीही शस्त्रसाठा जगात भारी!

व्हॅटिकन सिटी येथील इतिहासासाठी आणि तिथं असणाऱ्या स्थापत्यशैलीसाठी ओळखली जाते.   

Jan 02, 2025, 14:46 PM IST

Swiss Guard Salary: इटलीची राजधानी असणाय़ऱ्या रोममध्ये असणाऱ्या व्हॅटिकन सिटी इथं रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू पोप राहतात. 

1/7

व्हॅटिकन सिटी

did you know Vatican City have an army interesting facts

जगातील सर्वात लहान देशांमध्ये व्हॅटिकन सिटी गणली जाते. साधारण 1000 एकर इतका भूखंड असणाऱ्या या देशात एक हजारहून कमी लोकसंख्या आहे. इथं भेट देण्यासाठी येणाऱ्यांचा आकडा मात्र मोठा आहे.

2/7

लहान लष्कर

did you know Vatican City have an army interesting facts

जगातील सर्वाल लहान अशा या देशाचं लष्करही तितकंच लहान आहे. दीडशेहून कमी लष्करी बळ असणाऱ्या या सैन्याकडे पोप यांच्या संरक्षणाची जबाबदारी असते.   

3/7

पोप

did you know Vatican City have an army interesting facts

हे जवान पोप यांच्या सुरक्षेखातर प्राण पणाला लावण्यासाठी तत्पर असतात. स्विस गार्ड हे जगातील सर्वाधिक जुन्या लष्करी दलांपैकी एक असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी काही निकषांचं पालन केलं जाणं महत्त्वाचं आहे. 

4/7

स्विस गार्ड

did you know Vatican City have an army interesting facts

स्विस गार्ड स्विस आणि कॅथलिक असणं गरजेचं आहे. या सैन्यातील जवान अविवाहित असून त्यांचं वय 19 ते 30 वर्षांदरम्यान असावं. शिवाय उंची 5'8" (174 सेमी) इतकी असणं अपेक्षित आहे.   

5/7

युद्ध

did you know Vatican City have an army interesting facts

व्हॅटिकन सिटीचं लष्कर युद्ध लढत नाही. पण, तरीही या सैन्यदलाच्या सेवेत असणाऱ्यांना मिळणारा पगार मात्र गडगंज असतो. या सैनिकांना €1,500 ते €3,600 म्हणजेच महिन्याला साडेचार लाख रुपये इतका पगार मिळतो. 

6/7

सुविधा

did you know Vatican City have an army interesting facts

काही अहवालांनुसार स्विस गार्ड सैनिकांना 13 महिन्यांचा पगार मिळतो. ज्यामध्ये मोफत घर, टॅक्स फ्री खरेदी, मुलांसाठी शाळा, दरवर्षी 30 सुट्ट्या अशाही सुविधा असतात. या सर्व सुविधा आणि वार्षिक पगार मिळून सैनिकांना साधारण 1 कोटी रुपये दिले जातात.   

7/7

शस्त्र

did you know Vatican City have an army interesting facts

हलबर्ड हे स्विस गार्ड लष्करारं पारंपरिक शस्त्र असून, त्यांना अद्ययावत धाटणीची शस्त्रही पुरवली जातात. ज्यामध्ये स्टेनगनचाही समावेश आहे.