रोहित शर्मा सिडनी टेस्ट खेळणार नाही? आकाशदीप सुद्धा बाहेर, पाचव्या टेस्टसाठी टीम इंडियात मोठे बदल

IND VS AUS 5th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा आणि पाचवा सामना हा 3 ते 7 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटातून तीन मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत. 

| Jan 02, 2025, 17:59 PM IST
1/7

ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर येथे बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी 5 वाजता या सामन्याला सुरुवात होणार असून मीडिया रिपोर्ट्समधून अशी माहिती समोर येतेय की कर्णधार रोहित शर्मा हा सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार नाही. यासह टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये देखील मोठे बदल होऊ शकतात.   

2/7

टीम इंडियाचा गोलंदाज आकाशदीप हा पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने सिडनी टेस्टमधून बाहेर पडल्याचे हेड कोच गौतम गंभीर याने सांगितले. आकाशदीप ऐवजी प्रसिद्ध कृष्णा किंवा हर्षित राणा याला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जाऊ शकते.

3/7

रोहित शर्माच्या ऐवजी सिडनी टेस्टमध्ये शुभमन गिलला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल फलंदाजीत भारतासाठी ओपनिंग करू शकतात. त्यामुळे तिसऱ्या नंबरवर गिल, चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीसाठी येऊ शकतो. 

4/7

सिडनी टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडिया रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन स्पिनर सोबत उतरेल. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सोबत मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा किंवा हर्षित राणा यांना संधी मिळू प्लेईंग 11 मध्ये संधी मिळू शकेल. 

5/7

बॉर्डर गावसकर सीरिजच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाचे नेतृत्व जसप्रीत बुमराहने केले होते. बुमराहच्या नेतृत्वात भारताने पर्थ टेस्ट सामना हा 295 धावांनी जिंकला. बुमराहच्या नेतृत्वात टीम इंडियाचा परफॉर्मन्स आताच्या तुलनेत फार चांगला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार जर रोहित सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार नसेल तर जसप्रीत बुमराहकडे कर्णधार पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.   

6/7

टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 : यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशींग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार) , मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा \ हर्षित राणा. 

7/7

3 ते 7 जानेवारी दरम्यान बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना हा सिडनी येथे पार पडणार आहे. टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.