भारत बंदच्या घोषणेनंतर सिंघु बॉर्डरच्या सुरक्षेत वाढ, पाहा आत्ताचे फोटो

Feb 02, 2021, 14:48 PM IST
1/5

भारत बंदच्या घोषणेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

भारत बंदच्या घोषणेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क

कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी 6 जानेवारीला भारत बंदची हाक दिलीय. या पार्श्वभुमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीय.  

2/5

चक्का जाम आंदोलनाची घोषणा

चक्का जाम आंदोलनाची घोषणा

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीवरून पोलिसांकडून शेतकरी नेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तसेच, अन्य कारवाईच्या विरोधात करण्यात शेतकऱ्यांच्या मनात रोष आहे. शेतकरी संघटनांकडून चक्का जाम आंदोलनाची घोषणा करण्यात आलीय.

3/5

पोलिसांची नाकाबंदी

पुलिस की किलाबंदी

सध्या सिंघु, गाझीपुरसह दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारोंच्या संख्येने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तर, सरकारने चर्चेद्वारे या समस्येतून मार्ग काढावा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. किसान मोर्चाच्या ४० संघटनांची जी ४० सदस्यीय समिती आहे, तिच्याशी सरकारने चर्चा करावी. असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.  

4/5

गाजीपुर बॉर्डर बंद

गाजीपुर बॉर्डर बंद

दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसेच, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, या घोषणेनंतर आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.

5/5

राज्य सभा में हंगामा

राज्यसभेत गोंधळ

कृषी कायद्याच्या विरोधात राज्य सभेत गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यावर चर्चेची मागणी केली. पण चर्चा आज नाही उद्या होईल असे राज्यसभा सभापती वैंकय्या नायडू यांनी सांगितले. यानंतर राज्यसभेत गोंधळ पाहायला मिळाला. राज्यसभेची कार्यवाही उद्या दुपारी 12.30 पर्यंत स्थगित करण्यात आलीय.