14 कलाकार टॉप 10 अभिनेत्री असून देखील 4 तास 15 मिनिटांचा हा चित्रपट ठरला फ्लॉप

अजय देवगन आणि संजय दत्त हे इंडस्ट्रीमधील असे कलाकार आहेत ज्यांनी जास्तीत जास्त हिट चित्रपट दिले आहेत. पण त्यांचा 2003 मध्ये आलेला एक चित्रपट फ्लॉप ठरला. 

Soneshwar Patil | Nov 23, 2024, 18:03 PM IST
1/6

एलओसी कारगिल

2003 मध्ये थिएटरमध्ये 'एलओसी कारगिल' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 4 तास 15 मिनिटांचा होता. ज्यामध्ये 33 कलाकारांनी काम केलं होतं. 

2/6

हिट चित्रपट

या चित्रपटात संजय दत्त आणि अजय देवगन यांच्या सारखे हिट चित्रपट देणारे कलाकार देखील होते. परंतु त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू शकला नाही. 

3/6

कारगिल युद्ध

मात्र, आता 'एलओसी कारगिल' हा चित्रपट प्रेक्षक टीव्हीवर खूप आवडीने बघताना दिसतात. या चित्रपटात कारगिल युद्धाची काहाणी दाखवण्यात आली होती. 

4/6

फ्लॉप चित्रपट

राज कपूर यांच्या वेळी 4 तासांचा चित्रपट असायचा. त्यामुळेच हा चित्रपट देखील 4 तासांचा होता. चित्रपटाचा वेळ खूप असल्यामुळे देखील हा चित्रपट फ्लॉप झाल्याचं म्हटलं जात आहे. 

5/6

अजय देवगन

या चित्रपटात अजय देवगन, सैफ अली खान, अक्षय खन्ना, मनोज बाजपेयी, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, रानी मुखर्जी, आणि करीना कपूर या चित्रपटात होते. 

6/6

कमाई

या चित्रपटाचे बजेट 33 कोटी रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 31.67 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट OTT वर आजही प्रेक्षक बघत आहेत.