भीषण दुर्घटनेनंतर पती-पत्नी शेवटच्या घटका मोजत होते, त्याचवेळी भूकेल्या सिंहांनी त्यांना घेरलं अन् नंतर...

Lion Attack In Car Crash: एखाद्या अपघातानंतर (Accident) तात्काळ मदत मिळावी असाच प्रत्येकाचा प्रयत्न असतो. पण जर तुमचा अपघात झाला असेल आणि त्याचवेळी दुसरं संकट आलं तर काय होईल. अशाच प्रकारे एका दांपत्याला भयानक अनुभव आला, जेव्हा कार अपघातानंतर ते जखमी अवस्थेत पडलेले असतानाच सिंहांनी (Lions) त्यांना घेरलं होतं. मात्र यानंतरही चमत्कारिकरित्या ते सुरक्षितपणे वाचले.   

Mar 19, 2023, 21:07 PM IST
1/5

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात 46 वर्षीय मारियो टायटस आपली पत्नी ग्रेस आपल्या पत्नीला उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात घेऊन चालले होते. मात्र रस्त्यात त्यांच्या कारचा अपघात झाला.   

2/5

अपघातानंतर त्यांची कार रस्त्यावरुन खाली उतरली होती. कारने झाडाला धडक दिल्यानंतर दोघेही गंभीर जखमी झाले होते. ग्रेसच्या पार्श्वभाग आणि पाठीची सहा हाडं तुटली आणि शरिरावर काही गंभीर जखमाही झाल्या. शरिरातून रक्त वाहत असतानाही ग्रेस शुद्धीत होत्या. पण फोनच्या माध्यमातून मदत बोलवणं दोघांनाही शक्य होत नव्हतं.   

3/5

अपघात झाला तेथून रुग्णालय फक्त 12 मैल दूर असल्याने आपण तिथपर्यंत पोहोचू असा विश्वास मारियोला होता. पण ग्रेसने त्याला आपण काही वेळापूर्वी रस्त्यावर सिंहांचा कळप पाहिला असल्याचं सांगितलं. यामुळे दोघांकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.  

4/5

ग्रेसने सांगितलं की "अपघात होण्याच्या काही वेळ आधीच आपण तीन सिहांना रस्त्यावर पाहिलं होतं. तो फार भयानक प्रसंग होता. चारही बाजून सिंहांच्या गर्जना ऐकू येत होत्या. मला प्रचंड वेदना होत होत्या. शरिरातून रक्त वाहत असल्याने मला सर्व शक्ती निघून जात असल्यासारखं वाटत होतं. मी आणि पतीने जर मरायचं असेल तर एकत्र मरु असं ठरवलं होतं".  

5/5

दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता एका चालकाने दुर्घटनाग्रस्त गाडी पाहिली आणि आपातकालीन सेवेशी संपर्क साधला. त्यांनी दोघांना गाडीबाहेर निघण्यात मदत केली. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे ग्रेसला रक्त देण्यात आलं. पुढील पाच महिने ग्रेस रुग्णालयात दाखल होती. इतकी जखमी असतानाही आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत 12 तास घालवूनही ती वाचली हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही असं डॉक्टरांनी म्हटलं.