Body Odor : उन्हाळ्यात शरीरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे जवळ कुणी उभं राहत नाही? 5 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Body Odor Remove Tips : बाजारात अनेक पावडर आणि डिओडोरेंट उपलब्ध आहेत. पण याचा सुगंध दिवसभर राहत नाही. अशावेळी घरगुती उपायांनी दूर करा घामाचा दुर्गंध. 

| May 08, 2024, 12:49 PM IST

How Do I Stop My Body Odor: उन्हाळा दिवसेंदिवस वाढत आहे. घामाने शरीर अक्षरशः घामाघूम होत आहे. असं असताना शरीरातून आणि काही विशिष्ट भागातून घाम येतो आणि पर्यायाने दुर्गंध देखील येतो. अशावेळी अनेकदा लाजिरवाण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. 

घाम येणे ही एक प्रक्रिया आहे जी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. घाम दुर्गंधीरहित असला तरी तो शरीरावरील जीवाणूंसोबत संयोग होऊन दुर्गंधी निर्माण करतो. बाजारात अनेक बॉडी टॅल्क आणि डिओडोरंट्स उपलब्ध आहेत, परंतु ते जास्त काळ दुर्गंधी रोखू शकत नाहीत. काही नैसर्गिक उपाय आहेत जे शरीराच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्यामुळे या घरगुती उपायांनी ही दुर्गंधी कमी करु शकता. 

1/7

बेकिंग सोडा

Body Odor Home Remedies

कॉर्न स्टार्चसह बेकिंग सोडाची पेस्ट लावल्याने नैसर्गिक गंध दूर होण्यास मदत होईल. या मिश्रणाचा एक पॅच सुरुवातीला थोड्या प्रमाणात लावून ठेवा. जर तुम्हाला काखेत जळजळ जाणवत असेल तर, त्वरीत धुवा आणि जळजळ कमी करण्यासाठी खोबरेल तेल लावा. पण हे मिश्रण तुम्हाला योग्य वाटल्यास काखेतील केस काढण्यास मदत होईल. 

2/7

दररोज भरपूर पाणी प्या

Body Odor Home Remedies

भरपूर पाणी प्यायल्याने तुम्ही आतून हायड्रेटेड राहाल. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे शरीरातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. हे आतड्यांमधील जिवाणूंची अतिवृद्धी रोखण्यास देखील मदत करू शकते.

3/7

टोमॅटोचा रस

Body Odor Home Remedies

टोमॅटोचा रस पिऊन आणि लावल्याने शरीराची दुर्गंधी प्रभावीपणे दूर केली जाऊ शकते. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, जे शरीराला दुर्गंधी आणणाऱ्या बॅक्टेरियांना मर्यादित करतात. तसेच टोमॅटोचा रस प्यायल्याने शरीराचे तापमान कमी होते, त्यामुळे घाम येणे कमी होते. फक्त कापडाचा तुकडा टोमॅटोच्या रसात भिजवा आणि काखेत लावा याने देखील घामाचा दुर्गंध कमी होण्यास मदत होईल.  

4/7

दररोज आणि व्यवस्थित आंघोळ करा

Body Odor Home Remedies

उन्हाळ्यात आंघोळ करणे फार महत्वाचे आहे. दिवसातून दोनदा चांगल्या अँटी-बॅक्टेरियल साबणाने अंघोळ करणे हा एक चांगला पर्याय आहे. हे बॅक्टेरिया शरीरापासून दूर ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे तुम्हाला कायमच दुर्गंधरहीत राहण्यास मदत होते. 

5/7

कडुलिंबाच्या पानांची पेस्ट

Body Odor Home Remedies

कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत. मूठभर कडुलिंबाची पाने पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. 15 मिनिटे लागू करा आणि धुवा. एका बादली पाण्यात कडुलिंबाची पाने टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा.

6/7

खोबरेल तेल

Body Odor Home Remedies

हा नेहमीच सर्वोत्तम पर्याय ठरतो. खोबरेल तेलाचे अनेक फायदे आहेत आणि त्यापैकी एक म्हणजे शरीराच्या दुर्गंधीशी लढा. आंघोळीनंतर काखेला खोबरेल तेल लावा. हे एक छान मंद सुगंध कायम राहील आणि तुमच्या शरीराला गंधमुक्त करेल. खोबरेल तेलाचा नियमित वापर केल्याने अंडरआर्म्सचा काळेपणाही दूर होतो. खोबरेल तेलामध्ये पौष्टिक गुणधर्म असतात.

7/7

लिंबू

Body Odor Home Remedies

शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी अर्धा लिंबू घामाच्या भागावर चोळा आणि ते सुकल्यानंतर धुवा. दिवसातून एकदा असे केल्याने दुर्गंधी दूर होईल. याशिवाय रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावे.