तिसरा श्रावणी सोमवार; विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात खास आरास

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झेंडू, गुलछडी , ऑर्किड , कामिनी ,गुलाब , ब्लू डिजे अशा फुलांची रंगसंगती

Aug 23, 2021, 11:26 AM IST

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास केली आहे.आज तिसरा श्रावण सोमवार आहे आणि शिव आणि वैष्णव एकच आहेत. याचा प्रत्यय श्री विठ्ठल रुपात आहे. सावळा विठोबा जरी वैष्णवांचे दैवत असले तरी देवाच्या मस्तकावर शिवलिंगाचा आकार आहे. हरी हरा भेद ।नाही करू नये वाद ।। संत तुकाराम यांनी सुद्धा आपल्या अभंगात याचे वर्णन केले आहे. यामुळेच श्रावण सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर 1 हजार किलो फुलांनी सजवले आहे. या मध्ये झेंडू, गुलछडी, ऑर्किड , कामिनी, गुलाब,  ब्लू डिजे अशा फुलांची रंगसंगती केली आहे.

1/5

फोटो सौजन्य - विठ्ठल-रुक्मिणी टूडे दर्शन 

2/5

फोटो सौजन्य - विठ्ठल-रुक्मिणी टूडे दर्शन 

3/5

फोटो सौजन्य - विठ्ठल-रुक्मिणी टूडे दर्शन 

4/5

फोटो सौजन्य - विठ्ठल-रुक्मिणी टूडे दर्शन 

5/5

फोटो सौजन्य - विठ्ठल-रुक्मिणी टूडे दर्शन