Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ब्लॉक, 'या' वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद, पाहा वेळ आणि पर्यायी मार्ग.  मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही आज एक्सप्रेसवेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

Apr 25, 2024, 17:53 PM IST
1/7

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत पुणे ते मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर ग्रॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. 

2/7

यासाठी या मार्गावर आज (24 एप्रिल) दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. पुणे मुंबई महामार्गावर दुपारी 12 ते 2 या वेळेत सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिली आहे.  

3/7

मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर 19.100 किमीवर दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम केले जाईल. या कालावधीत मुंबई कॉरिडॉरवर सर्व प्रकारच्या हलक्या व जड-अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.

4/7

या कालावधीत वाहनधारक पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावर पुणे ते मुंबई हायवेवर (पुण्याकडून मुंबईकडे येणारा) हलकी वाहने मुंबई हायवे लेन 55 किमी वळवून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.48  या जुन्या पुणे-मुंबई मार्ग खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाक्यामार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होऊ शकतील, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. 

5/7

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गामुळे, मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ 4-5 तासनवारून 2 तासांवर आला आहे. मुंबई-पुणे येथून प्रवास करणारी अनेक खासगी वाहने, एस.टी. बसेस, खाजगी वाहतूक बसेस आणि मालवाहू वाहने द्रुतगती मार्गाचा वापर करतात.  

6/7

महाराष्ट्रातील दोन सर्वात मोठी शहरे मुंबई आणि पुणे यांना जोडणारा 94.5 किमी लांबीचा द्रुतगती मार्ग 2002 मध्ये बांधून पूर्ण झाला. 

7/7

कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगानं प्रवास करण्याची ओळख देशवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे.