महाराष्ट्रतील 'नकट्या रावळ्याची' अनोखी पायविहीर; अद्भूत स्थापत्यकला, छुप्या खाचांमध्ये लपवले जायचे धान्य आणि दारुगोळा

12 व्या शतकातील शिलाहार स्थापत्य बांधकामाचा अदभूत नमुना  कराडमध्ये पहायला मिळतो. नकट्या रावळ्याची विहीर पाहिली की थक्क होऊन जायला होतं

वनिता कांबळे | Apr 24, 2024, 23:37 PM IST

Naktya Ravlyachi Vihir : कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांच्या प्रीतिसंगमावर कराडच्या भुईकोट किल्ल्यातली ही नकट्या रावळाची विहीर. 12 व्या शतकातली ही विहीर शिलाहार राजवटीत बांधण्यात आली.. कोयनेच्या पात्रापासून पंच्याहत्तर फूट उंचीवर बांधलेल्या या विहिरीची लांबी 120 बाय 90 फूट आहे.. विहिरीत उतरण्यासाठी चोहोबाजूंनी पायऱ्या आहेत. 

1/7

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामंध्ये प्राचीन पायविहीर पहायला मिळतात. अशीच एक विहीर सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आहे. 

2/7

विहिरीचे बांधकाम रेखीव अशा चिर्‍यांचे आहे.  बांधकामामध्ये ठराविक अंतरावर  छुप्या खाचा आहेत. या खाचांमध्ये  धान्य आणि दारुगोळा लपवला जायचा. 

3/7

विहिरीची लांबी 120 बाय 90 फूट आहे.  मुख्य विहीर अकराशे अकरा चौरस मीटरची आहे. तिच्या ईशान्य बाजूचा भाग थोडा गोलाकार दिसतो. एकूण 82 पायर्‍या असून प्रत्येक वीस पायर्‍या संपल्यावर मोठी पायरी म्हणजे थांबण्याची जागा आढळते. 

4/7

विहिरीत खापरी पाटामार्फत कोयनेचे पाणी सोडले जात असावे. या विहीरीची खोली कोयनेच्या पात्राइतकी असावी असा अंदाज लावला जातो. या विहीला अनेक आहेत. यामुळे ही विहीर राजवाड्यासारखी दिसते.   

5/7

'नकट्या रावळ्याची'  विहीर  ही स्थापत्यकलेचा अद्भूत नमुना आहे. विहिरीत उतरण्यासाठी पार्‍यांच्या चोहोबाजूंनी मार्ग असून वरून बारवेचा आकार सुरेख दिसतो.

6/7

ही पायविहीर 'नकट्या रावळ्याची'  विहीर म्हणून ओळखली जाते. 12 व्या शतकात ‘शिलाहार राजवटीत ही विहीर बांधली गेली.

7/7

कराड शहराच्या वायव्येस एका टेकडीवर प्रीतीसंगमावरील पंताचा कोट परिसरात ही अनोखी पायविहीर आहे.