भारतातल्या 'या' गावात सापडली 1500 वर्षांपूर्वीची मंदिरं! विष्णू मूर्ती, स्तंभावरील शब्दाचं गूढ

1500 Year Old Ancient Temples Found In Indian Village: ही मंदिरं फारच सुंदर आहेत. मात्र त्याचबरोबर या मंदिरांचं ऐतिहासिक महत्त्वही फार अधिक आहे. या मंदिरांमध्ये विष्णूची मुर्ती सापडली आहे. तसेच येथील एका स्तंभावर एक शब्द कोरलेला सापडला असून त्यावरुन वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. पाहूयात या मंदिराचे फोटो...

Swapnil Ghangale | Feb 27, 2024, 08:57 AM IST
1/7

1500 Year Old Ancient Badami Chalukya Temples Found In Indian Village

तेलंगणमधील एका गावात दोन पुरातन मंदिरं सापडली आहेत. चालुक्य राजवटीच्या काळातील बदामी शैलीत उभारण्यात आलेल्या या मंदिरांपैकी एक मंदिर 1300 ते 1500 वर्षांपूर्वीचं असून दुसरं मंदिर 1200 वर्षांपूर्वीचं आहे. बांधकामाची शैली कदंम्ब नागर पद्धतीची आहे.  

2/7

1500 Year Old Ancient Badami Chalukya Temples Found In Indian Village

तेलंगणमधल्या कृष्णा जिल्ह्यातील मदीमनकायम गावामध्ये ही मंदिरं सापडली आहे. चालुक्य राजवटीने 6 व्या ते 12 व्या शतकादरम्यान मध्य दख्खन आणि मध्य भारताच्या मोठ्या प्रांतावर राज्य केलं. त्याच काळातील ही मंदिरं आहे. एकूण 3 वेगवेगळ्या राजवटी या काळात होऊन गेल्या.  

3/7

1500 Year Old Ancient Badami Chalukya Temples Found In Indian Village

पुलकेशी पहिला पासून सन 550 पासून चालुक्य राजवटीला सुरुवात झाली. पुलकेशी पहिलाने वतापी (सध्याच्या कर्नाटकमधील बगलकोटमधील बदामी) शहरावर ताबा मिळवला आणि हे शहर त्याने राजधानी म्हणून घोषित केलं. पुलकेशी पहिला आणि त्याच्या वंशजांना इतिहासकार बदामीचे चालुक्य असं संबोधतात. याच बदामीच्या चालुक्यांच्या काळात ही मंदिरं उभारली आहेत.

4/7

1500 Year Old Ancient Badami Chalukya Temples Found In Indian Village

पुलकेशी दुसरा हा चालुक्य राजवटीमधील सर्वात शक्तीशाली, सामर्थ्यशाली राजा होता. त्याने उत्तरेला आपली राजवट पालवा सम्राज्याच्या सीमेपर्यंत वाढवली. नर्मदेच्या तिरावर हर्ष राजाबरोबर झालेल्या लढाईत पुलकेशी दुसराने विजय मिळवत हा प्रदेशही ताब्यात घेतला. याच काळात इथे मोठ्या प्रमाणात मंदिरांची उभारणी करण्यात आली. त्यापैकीच ही मंदिरं आहेत.  

5/7

1500 Year Old Ancient Badami Chalukya Temples Found In Indian Village

यापैकी एका मंदिराचा केवळ सभामंडप शिल्लक राहिला असून आतमध्ये शिवलिंगाचं स्थान रिक्त आहे. दुसऱ्या एका मंदिरामध्ये विष्णूची मूर्ती दुभंगलेल्या अवस्थेत जमीनीवर दिसून येतेय. या मंदिरांमध्ये पुजा होत नाही.

6/7

1500 Year Old Ancient Badami Chalukya Temples Found In Indian Village

"ही मंदिरं फार महत्त्वाची आहेत. अल्लमपूर येथील बदामी चालुक्य मंदिरांशिवाय पहिल्यांदाच अशी मंदिरं आढळून आली आहेत. इतक्या प्रदीर्घ काळ अशी मंदिरं टिकून राहणं फार दुर्मिळ आहे," असं तेलगु विद्यापिठाचे सहाय्यक प्राध्यपक डॉक्टर श्रीनिवासन यांनी म्हटलं आहे.  

7/7

1500 Year Old Ancient Badami Chalukya Temples Found In Indian Village

एका मंदिरामध्ये दगडावर गांडालोरानूर अशी अक्षरं लिहिलेली आहेत. या शब्दाचा नेमका अर्थ काय हे अद्याप समजलेलं नाही. तरीही यापैकी पहिल्या दोन अक्षरांचा म्हणजेच 'गांडा'चा अर्थ कानडा भाषेत हिरो असा होतो.