केस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?

White hair reason : केस, त्वचा आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. केसांमध्ये दोन प्रकारचे मेलॅनिन रंगद्रव्य असते. युमेलॅनिन हे काळ्या, तपकिरी आणि सोनेरी केसांमध्ये, तर फिओमेलॅनिन लाल केसांमध्ये आढळते. 

Saurabh Talekar | Feb 26, 2024, 22:51 PM IST

White hair : केस पांढरी होणं म्हणजे वाढत्या वयाचे लक्षण आहे. वयाच्या तिशीनंतर दर दहा वर्षांत १० ते २० टक्के केस पांढरे होतात. वयाच्या ६१ ते ६५ वर्षांपर्यंत ९१ टक्के लोकांमध्ये काही प्रमाणात तरी पांढरे केस दिसतातच. केस पांढरे खरं कारण डॉ. किशोर पवार यांनी सांगितलं आहे.

1/8

केसांमध्ये मेलॅनिन पेशींमार्फत (melanocytes) मेलॅनिन तयार होते. केसांच्या मुळांशी, रोमपुटकांजवळ (hair follicles) असलेल्या या पेशी केसांमध्ये रंगद्रव्य सोडतात.   

2/8

वयपरत्वे मेलॅनिन पेशी कमी झाल्यामुळे, रंगद्रव्य कमी तयार होते. परिणामी, केस पांढरे होतात. मेलॅनिन पेशींची निर्मिती केसांच्या मुळाशी अल्पसंख्येत असलेल्या मेलॉनोसाइट स्टेमसेलमार्फत केली जाते. 

3/8

दीर्घ काळात अनेक पेशी तयार होतात. त्यातील काही पेशी केसांच्या मुळाशी जातात. तेथे त्या परिपक्व होतात, असा संशोधकांचा समज होता. मात्र, असे आढळले, की या पेशी मुळांपासून वर-खाली स्थलांतरित होत राहतात. 

4/8

वय वाढले, की स्थलांतर थांबते. त्यामुळे मेलॅनिन पेशी कमी होतात. परिणामी, केस पांढरे होतात. उंदरांमध्ये केसांची सक्रिय वाढ होत असताना, मेलॅनिन स्टेम सेल या रोमपुटकांजवळ जातात व तेथे त्यांचे रूपांतर परिपक्व मेलॅनिन पेशींमध्ये होते, असे संशोधकांना आढळले. 

5/8

आश्चर्य म्हणजे, त्यानंतर केस वाढताना मेलॅनिन पेशी पुन्हा रोमपुटकांच्या खोबणीजवळ स्थलांतरित होतात. तेथे उलट परिणाम होऊन, त्यांचे रूपांतर पुन्हा स्टेम पेशींमध्ये होते. 

6/8

केसांचे वय वाढते, पेशी मात्र स्थलांतर करत नाहीत. त्या रोमपुटकाला चिकटतात. त्यामुळे त्यांचे रूपांतर मेलॅनिन पेशी किंवा सतत वाढणाऱ्या स्टेमसेलमध्येही होत नाही, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

7/8

आजवर शास्त्रज्ञांचा असा समज होता, की कालौघात स्टेम पेशींची संख्या घटल्यामुळे केस पांढरे होतात. मात्र, आपल्या केसांमध्ये निष्क्रिय मेलॅनिन स्टेम पेशी असल्याचे समोर आल्याने, त्यांना पुन्हा सक्रिय करून केसांना पुन्हा रंग प्राप्त करणे शक्य आहे का? असा प्रश्न उभा राहिला होता.

8/8

या विषयावर संशोधनाने आता लक्ष केंद्रित केले आहे. या वर्तनाचा अभ्यास करून मेलोनोमा या घातक कर्करोगावरील उपचारांबाबतही संशोधन चालू असल्याचं डॉ. किशोर पवार यांनी सांगितलं आहे.