महाराष्ट्रातील 'या' रोमँटिक जागा, जिथे पार्टनरसोबत घालवा निवांत वेळ

Maharashtra Sunset Points : महाराष्ट्रात गुलाबी थंडीच वातावरण आहे. अशावेळी जोडीदारासोबत वेळ घालवणे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रातील अशी 10 ठिकाणे जिथे तुम्ही जोडीदारासोबत सनसेट पाहू शकता. 

Maharashtra Sunset Points : महाराष्ट्रात गुलाबी थंडीच वातावरण आहे. अशावेळी जोडीदारासोबत वेळ घालवणे अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रातील अशी 10 ठिकाणे जिथे तुम्ही जोडीदारासोबत सनसेट पाहू शकता. 

1/9

माथेरान

10 Romantic Sunset Places in Maharashtra

माथेरान हे महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय असा स्पॉट आहे. अगदी प्राईम डिस्टिनेशन म्हणून माथेरान ओळखला जातो. माथेरानचा सूर्यास्त अतिशय खास असतो. उंच टेकडीवर आपल्या जोडीदारासोबत सूर्यास्त अनुभवणे अतिशय खास आहे. हनिमूनसोबतच अवघ्या दोन दिवसांच्या लाँग विकेंडसाठी हा उत्तम पर्याय आहे. 

2/9

महाबळेश्वर

10 Romantic Sunset Places in Maharashtra

महाबळेश्वर हे देखील महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय ठिकाण. आपल्या पार्टनरसोबत थंडी आणि लालसर केशरी सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी ही जागा अतिशय उत्तम आहे. गुलाबी थंडी आणि सूर्यास्ताचा तो नजरा तुमच्यातील प्रेम आणखी वाढवेल. 

3/9

तारकर्ली

10 Romantic Sunset Places in Maharashtra

निळ्याशार सुंदर समुद्रात जाऊन सोनेरी रंगाचा सूर्यास्त पाहणं यासारखं सुख आहे. आणि तुमच्या या सुखात जोडीदार सहभागी असेल तर हा दुग्धशर्करायोग म्हणावा लागेल. महाराष्ट्रातील तारकर्लीमध्ये हे सुख तुम्ही अनुभवू शकता. 

4/9

लोनार झील

10 Romantic Sunset Places in Maharashtra

असं म्हटलं जातं की, 1000 वर्षांपूर्वी उल्कापात झाला ज्यामधून लोनार झीलची निर्मिती झाली. येथे जाऊन जोडीदारासोबत सूर्यास्त पाहणे यासारखा सुंदर अनुभव नाही. स्कंद पुराण आणि पद्म पुराण यांसारख्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये लोणार सरोवराचा प्रथम उल्लेख आहे. सरोवराला भेट देणारे पहिले युरोपियन ब्रिटिश अधिकारी जेई अलेक्झांडर 1823 मध्ये होते. आइन-ए-अकबरी, 1600 सीई मध्ये लिहिलेल्या कागदपत्रात या तलावाबद्दल म्हटले आहे. 

5/9

पाचगणी

10 Romantic Sunset Places in Maharashtra

महाबळेश्वर जवळ असलेल्या पंचगणीत देखील सूर्यास्ताचा सुंद नेत्रदीपक असा अनुभव अनुभवतू येणार आहे. पाचगणी हे सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले एक शांत डोंगरी शहर आहे. आल्हाददायक हवामान आणि शांत वातावरणामुळे हनिमूनकरिता हे लोकप्रिय ठिकाण आहे. 

6/9

मरीन लाईन्स

10 Romantic Sunset Places in Maharashtra

हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय ठिकाणी. अनेकजण येथे सूर्यास्त पाहण्यासाठी येथे लांबून येथे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासाठी हे आकर्षणाचं स्थळ आहे. मुंबईतल्या गर्दीतून थोडं बाजूला जाऊन तुम्ही मरीन लाईन्स जवळ सूर्यास्ताचा नजारा घेऊ शकता. 

7/9

आंजर्ले बीच

10 Romantic Sunset Places in Maharashtra

कोकणातील आंजर्ले बीच इतर समुद्र किनाऱ्यासारखाच लोकप्रिय आहे. दापोलीपासून अवघ्या 20 किमी अंतरावर हा समुद्र पसरला आहे. प्राचीन आणि भव्य अशा गणेश मंदिराच्या साक्षीने तुम्ही जोडीदारासोबत सूर्यास्त बघण्याचा आनंद लुटू शकता. 

8/9

मुरुड-जंजिरा

10 Romantic Sunset Places in Maharashtra

महाराष्ट्रातील मुरुड-जंजिता हा समुद्र किनारा फारच सुंदर आहे. मुंबईपासून बाहेर पण अगदी जवळच हा समुद्र किनारा आहे. अगदी पार्टनरसोबत एका दिवसाचा प्रवास येथे शक्य आहे. त्यामुळे हा सूर्यास्त अजिबातच चुकवू नका. 

9/9

दिवेआगार बीच

10 Romantic Sunset Places in Maharashtra

कोकण हे निसर्गरम्यच आहे. पण तरी देखील कोकणातील दिवेआगार बीच सूर्यास्त पाहण्यासाठी अतिशय खास आहे. जोडीदारासोबत हा क्षण अजिबातच चुकवू नका.