पंतप्रधानांनी रामलल्लाला घातला साष्टांग दंडवत! काय आहेत साष्टांग नमस्काराचे फायदे?

Ram Mandir Inauguration : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणाचा क्षण याची देही याची डोळा अख्या देशाने अनुभवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला. 

Jan 22, 2024, 14:17 PM IST
1/11

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाला यांची प्राणप्रतिष्ठा विधीपूर्वत करण्यात आलं. 

2/11

यावेळी नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाला साष्टांग नमस्कार घातला. 

3/11

राम मंदिराच्या भूमिपूजन 2020 मध्ये करण्यात आले तेव्हाही मोदी यांनी श्रीरामाला साष्टांग नमस्करा घातला होता. 

4/11

तुम्हाला माहिती आहे का, नमस्काराचे तीन प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसकि

5/11

कायिक म्हणजे साष्टांग नमस्कार, हा सर्वात श्रेष्ठ असा नमस्कार मानला जातो.   

6/11

हा नमस्कार करताना हृदय, माथा, पाय, गुडघे आणि हात ही शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात, म्हणून याला अष्टांग प्रणाम असेही म्हटलं जातं. नमस्कारच्या या मुद्रेतून आपल्या शरीराला फायदा मिळतो. 

7/11

मानसिक तणाव आणि शारीरिक मरगळ कमी होण्यास ही मुद्रा फायदेशीर आहे. 

8/11

साष्टांग नमस्कार करताना पोटावर आवश्यक तो दबाव पडतो आणि पोटाचे स्नायू त्यामुळे खेचले जातात आणि या मुद्रेमुळे तुमचं मेटाबॉलिजम चांगल राहण्यास मदत मिळते.   

9/11

जे लोक नियमित न चुकता साष्टांग नमस्कार करतात त्यांना आपली रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास म्हणजे मधुमेह नियमंत्र ठेवण्यास मदत मिळते, असं तज्ज्ञ सांगतात. 

10/11

साष्टांग नमस्कार केल्याने आपल्यामध्ये धैर्य आणि संयम जागृत होऊन आपलं मानसिक आरोग्य चांगल राहत असं म्हणतात.

11/11

जे लोक एका जागेवर तासंतास बसून असतात त्यांच्या पाठीच्या मणक्यात ताणल्यासारखं आणि खेचून होतो. या लोकांनी साष्टांग नमस्कार केल्यास त्यांचा पाठीचा कणी बळकट होऊन पाठीशी निगडीत सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)