नाशिक : नाशिक विधनापरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आज शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी बाजी मारली आहे. या ठिकाणी भाजपने शिवसेनेविरोधात मतदान केले होते. मात्र, शिवसेनेने बाजी मारत भाजपला जोरदार धक्का दिलाय. भाजपने पाठिंबा दिलेले आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा पराभव झालाय.
नाशिकमध्येही शिवसेनेचे नरेंद्र दराडें विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकूण ६४४ मतदान झाले . १०० टक्के मतदान झालेल्या या निवडणुकीच्या मतमोजण साठी प्रत्येक टेबलवर एक उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी तहसीलदार आणि नायब तहसिलदार तैनात करण्यात आला होता. नाशिक जिल्हाधिकरी कार्यालयात मतमोजणीला ८ वाजता सुरुवात झाली. तर गेल्या वेळी वादग्रस्त निकाल बघता यावेळी संपूर्ण काळजी घेण्यात आली होती.