Maharashtra Farmer : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग... अशी म्हण आहे. या म्हणीप्रमाणे जळगाव मधील एका शेतकरी तरुणाने थेट डोक्याला बाशिंग बांधून अनोखे आंदोलन केले आहे. लग्न जुळत नसल्याने हा तरुण शेतकरी त्रस्त झाला आहे. भर चौकात हातात बोर्ड घेवून या तरुणीने लग्न जुळावे म्हणून खटाटोप केला आहे. या शेतकऱ्याची पंचक्रोशीत चांगलीत चर्चा रंगली आहे.
शेतकरी तरुणांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना विवाहासाठी मुली मिळत नसल्याने पाचोरा येथील एका युवा शेतकऱ्यांनी अनोखे आंदोलन करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील तरुण शेतकरी पंकज राजेंद्र महाले यांने पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डोक्याला वाशिंग बांधून अनोखे आंदोलन केले. बागायतदार आहे बागायतदारी पाहिजे असे फलक हातात घेऊन त्याने हे अनोखे आंदोलन केले.
पंकज महाले असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. आपण मेहनती व सधन बागायतदार शेतकरी असून आपल्याला बागायतदारीनेच म्हणजेच शेतात काम करणारी बायको हवी असे थेट जाहीर करून शेती करणारे तरुण व शेतकऱ्यांच्या मुलांना विवाहासाठी येणाऱ्या अडचणी या समाजासमोर मांडले आहे. तसेच या अनोख्या आंदोलनामुळे समाजाच्या डोळ्यात मात्र झणझणीत अंजन घातले आहे.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता एका वेगळ्याच सामाजिक समस्येचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमणं कठीण झाले आहे. अगदी शेतकऱ्यांच्या मुलींनाही नोकरीवाला मुलगाच हवा आहे. लग्नासाठी मुलीच मिळत नसल्यानं शेतकरी उपवर मुलांचं लग्नाचं वय चाळीशीपर्यंत वाढल आहे.
राज्यातल्या शेतक-यांच्या मुलांच्या लग्नासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरली होती. शेतकरी मुलासोबत लग्न करायला मुलगी तयार होत नाही. राज्यभरात ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. तेव्हा शेतक-यांच्या मुलासोबत लग्न करणा-या मुलीला दहा लाख आणि तीच्या वडिलांना पाच लाख रुपये द्या अशी मागणी स्वाभिमानीने केली होती. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर वरात मोर्चा काढून धडकणार असल्याचेही जाहीर केले होते.