सावलीतला सूर्य तो...

राहुल द्रविडमध्येही काही मर्यादा होत्या. मात्र आपल्या मर्यादा समजून घेत टीमसाठी सर्वस्व ओतणारा खेळाडू म्हणून तो नेहमीच ओळखला जाईल. त्याची प्रत्येक लाजवाब खेळी ही त्याच सामन्यात त्याच्या सहकारी खेळाडूनं केलेल्या एखाद्या ऐतिहासिक खेळीपुढे झोकाळून गेलीय. समोरचा खेळाडू संपूर्ण बहरात असताना त्याला टीमच्या हितासाठी साथ देणे आणि त्याचबरोबर आपला ही सर्वोत्तम खेळ तितक्याच योग्यतेने खेळण्याची कला असलेले किती सभ्य खेळाडू आज क्रिकेटजगतात शिल्लक आहेत?

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 8, 2013, 08:58 AM IST

ओंकार डंके, असिस्टंट प्रोड्युसर, झी मीडिया
राहुल द्रविडनं T-20 खेळणं म्हणजे साने गुरुजींनी सावरकरांसारखे जहाल भाषण देण्यासारखे आहे. सहा वर्षांपूर्वी जेव्हा आयपीएलला सुरुवात झाली, त्यावेळी माझा एक मित्र मला कुत्सितपणे हे हिणवत होता. अर्थात त्याच्या या टवाळखोर विधानाला आधारही तितकाच होता. पंचपक्वान्नावर वाढलेल्या व्यक्तीला रस्त्यावरचे फास्ट फूड मानवणारच नाही. आणखी वेगळ्या शब्दात सांगयचे म्हटलं तर मोहम्मद रफी सारखा स्वर्गीय आवाजाचा गायक जर मिल्का प्रमाणे ‘लैला ते ले लेगी …म्हणू लागला तर काय होईल? तशीच साऱ्यांची अवस्था द्रविडच्या T-20 खेळण्याबाबत झाली होती.
आता राहुल द्रविड टेस्ट आणि वन-डे प्रमाणेच टी-20 मधूनही निवृत्त झालाय. तो ज्या राजस्थान रॉयल्सच्या टीमचा कॅप्टन म्हणून चॅम्पियन्स लीग खेळला त्या टीममध्ये एक शेन वॉटसन सोडला तर कोणीही आंतरराष्ट्रीय स्टार नव्हता. तरी त्या टिमनं फायनलपर्यंत अपराजित राहण्याची किमया साधली. १८ वर्षाचा संजू सॅमसन ते ४२वर्षांपर्यंतच्या प्रवीण तांबेपर्यंत. राजस्थानच्या प्रत्येक खेळाडूला रॉयल फॉर्म सापडला याचे कारण होते राहुल द्रविडचे नेतृत्व.
अर्थात टीमसाठी सर्वस्व ओतण्याची आणि सहका-यांच्या सर्वोत्तम खेळाचा अविभाज्य घटक बनण्याची त्याला सवय अगदी पहिल्या टेस्टपासून आहे. लॉर्डसमध्ये स्विंग खेळपट्टीवर सातव्या क्रमांवर फलंदाजीला येऊन पदार्पण करताना त्यानं काढलेल्या ९५ रन्समध्ये कॉपीबुकमधील अनेक फटके सापडतील. पण सर्वांना लक्षात आहे त्या टेस्टमधलं सौरव गांगुलीचं नवाबी पदार्पण आणि त्यांची तडफदार सेंच्युरी. सचिन तेंडुलकरच्या स्पेशल आणि लक्ष्मणच्या मॅजिकल इनिंगमध्ये द्रविडचा सहभाग हा नेहमीच मोलाचा आणि महत्तवाचा राहिलाय.
१९९९च्या वर्ल्डकपमध्ये तो भारताचा टॉप स्कोअर होता हे किती जणांच्या लक्षात आहे? त्याच वर्ल्डकपमध्ये गांगुलीनं श्रीलंकेविरुद्ध काढलेले १८३ आणि पुढे काही महिन्यांनी हैदराबादमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सचिनच्या १८६ रन्सच्या इनिंगची आठवणी आजही रंगवल्या जातात. मात्र या दोन्ही इनिंग द्रविडच्या १४५ आणि १५३रन्सशिवाय पुर्ण होऊ शकल्या असत्या का? वन-डे क्रिकेटमध्ये ३००रन्सच्या दोन पार्टनरशिपमध्ये सहभागी असणारा द्रविड हा एकमेव खेळाडू आहे.
परदेशी खेळपट्यांवर विशेषत; स्वींग गोलंदाजीवर भारतीय बॅटसमनची उडणारी भंबेरी ही नेहमीचीच बोंब. द्रविडनं २००२मध्ये इंग्लंड दौ-यात तीन सेंच्युरी झळकावत परदेशी वातावरणात कसं खेळायचं याच उदाहरण घालून दिलं. पुढच्या आठ वर्षात भारतानं परदेशात मिळवलेल्या अनेक संस्मरणीय विजयाचा पाया या तीन सेंच्युरीनं रचला गेला.

२००४मध्ये भारताचा पाकिस्तान दौ-याचा हिरो ठरला तो मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग. मात्र त्याच सीरिजमधल्या शेवटच्या दोन्ही टीममधल्या अन्य कोणत्याही खेळाडूला सेंच्युरी झळकवण्यात अपयश आले असताना राहुल द्रविडनं २७०रन्स काढले होते. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयात याच मालिका विजयात याच २७० रन्सचे किती मोल होते हे सांगण्याची कोणती वेगळी गरज आहे?
राहुल द्रविडमध्येही काही मर्यादा होत्या. मात्र आपल्या मर्यादा समजून घेत टीमसाठी सर्वस्व ओतणारा खेळाडू म्हणून तो नेहमीच ओळखला जाईल. त्याची प्रत्येक लाजवाब खेळी ही त्याच सामन्यात त्याच्या सहकारी खेळाडूनं केलेल्या एखाद्या ऐतिहासिक खेळीपुढे झोकाळून गेलीय. समोरचा खेळाडू संपूर्ण बहरात असताना त्याला टीमच्या हितासाठी साथ देणे आणि त्याचबरोबर आपला ही सर्वोत्तम खेळ तितक्याच योग्यतेने खेळण्याची कला असलेले किती सभ्य खेळाडू आज क्रिकेटजगतात शिल्लक आहेत?
अजिंक्य राहणे, संजू सॅमसन, दिनेश याज्ञिक, स्टुअर्ट बिन्नी, अशोक मनेरिया, प्रवीण तांबे, राहुल शुक्ला, कूपर या सा-या नवख्या खेळाडूंना घेऊन जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा पाडाव करणारा कॅप्टन हा केवळ राहुल द्रविडच असू शकतो. संघासाठी आणि सहका-यांसाठी निस्वार्थीपणे सारं काही देण्याच्या त्याच्या या वृत्तीमुळेच फिक्सिंगच्या राखेतून राजस्थान रॉयल्सचा संघ फिनिक्स भरारी मारु शकला.
सामान्य खेळाडूंच्या असमान्य खेळामुळेच राजस्थान रॉयल्सची टीम ही आयपीएलमधली अनेकांची आवडती टीम आहे. या टीमचा पहिला कॅप्टन शेन वॉर्नही हरहुन्नरी होता. पण ‘शो मन’ शिप त्याच्या रक्तातच होती. टी-२० ला लागणारा सारा मसाला त्याच्यामध्ये भरलेला होता.राहुल द्रविडनं त्याच्या उलटपद्धतीनं आणि तितक्याच परिणामकतेनं रॉयल्सची कॅप्टनस