काहीतरी लिहावं असं खूप दिवसांपासून वाटत होतं...ब्लॉग लिहण्याइतके आपण काही मोठे झालेलो नाही असा विचार करण्यातच खूप दिवस गेले. पण मग मला फ्रेंडशीप डे चा मुहूर्त मिळाला. तसं वर्षभरात अनेक ‘डे’ज येतात, पण इतर ‘डे’ज ज्या नात्यांबद्दल असतात त्यांचा कितीही आदर आणि प्रेम असला तरी खुलेपणाने त्यांच्याविषयी लिहणं जरा कठीणचं आहे. फ्रेंड्सचं काय..त्यांना काहीही.. कुठेही.. कसंही ..बोला...सगळं चालतं..
मी सहावीत होते. क्लासवरुन येताना खूप पाऊस पडत होता. रस्त्यात एका ओळखीच्याचं घर लागतं, त्यांच्याकडून उद्या देते असं सांगून छत्री घेतली. दुसऱ्या दिवशी ती छत्री शाळेत हरवली. मी आणि माझ्या मैत्रिणीने शाळेत ती छत्री सगळीकडे शोधली. मला खूप टेन्शन आलं होतं. मी खूप रडले. छत्री कशी देणार. घरी सांगितलं तर खूप ओरडा बसेल या भीतीने मी घाबरले होते. तीन दिवस मी डबा खात नव्हते. वर्गात लक्ष लागत नव्हतं. चक्क पीटीच्या तासाला मी खेळत नव्हते. त्यानंतर माझ्या त्या मैत्रीणीने मला एक नवीन छत्री आणून दिली. तिने सांगितलं आपण त्यांना सांगूया तुमची छत्री हरवली ही नवीन छत्री घ्या. मला खूप बरं वाटलं. आम्ही तसंच केलं. पण छत्री आली कुठून हे कळाल्यावर मी आणखीच घाबरले..असो तीची त्यामागची भावना साफ होती. ती माझी सखी होती. शाळेत कोणत्याही खेळात, सांस्कृतिक कार्यक्रमात,एनसीसीमध्ये सगळीकडे आम्ही दोघी एकत्र असायचो. विशेष म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये पण राहत होतो.
त्यावेळी मैत्रीची जी व्याख्या डोक्यात बसली ती आजही कायम आहे. अर्थात त्यासाठी तशी मैत्री पण हवी.
...............
कॉलेजमध्ये बीएमएमला आमचा नऊ जणांचा ग्रुप होता. तीन वर्षात सहा सेमिस्टर, एका सेमिस्टरला सहा विषय, आणि प्रत्येक विषयाचे कमीतकमी दोन तरी प्रोजेक्ट आणि त्याचे प्रेझेंटेशन.. मी एकटी मराठी मीडियमची आणि बाकी आठ जण कॉन्व्हेंटचे.. माझ्या पहिल्या प्रेझेंटेशनपासून ते लास्ट इअरला प्रोजेक्टमध्ये 50 आउटऑफ 50 मार्क्स मिळेपर्यंत या मित्रांनी मला खूप साथ दिली. प्रेझेंटेशनसाठी इंग्लिश प्रोनान्सिएशनचा क्लास घेण्यासाठी माझे फ्रेंड्स एवर रेडी असायचे..
सेकंड इअरला असताना आम्ही दोन पानांचं टॅबलॉइड काढलं. दुसऱ्याचं एडिशनला गेटवरचा सिक्युरिटी गार्ड बाहेरच्या पार्किंगसाठी कसे पैसे घेतो ही बातमी छापली. त्याचं मोबाईल शूटही काढलं होतं. आणि जाणून बुजून सरांना लास्ट कॉपी न दाखवता ते छापलं आणि जे व्हायचं होतं तेच झालं. आम्ही पेपर बंद होऊ दिला पण ती कोणाची आयडीया होती आणि ते केलं कोणी हे सांगितलं नाही.
कॉलेज संपल्यावर हे सगळं संपेल असं वाटलं होतं. पण आजही सगळे मित्र मीडियामध्ये नोकरीला असलो तरी भेटतो.. महत्वाचं असेल तर वेळ काळ काहीच बघत नाही...
घरातले एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी नाही म्हणत असतील तर आम्ही एकमेकींच्या घरी ज्यापद्धतीने कन्व्हेन्स करतो ना ते सॉलीडच आहे. ‘हे शेवटच प्लीज तीला पाठवा...’असं गेल्या पाच वर्षापासून आम्ही सांगतं आलोय.. त्यामुळे गेल्या पाच वर्षात जेव्हा जेव्हा आम्ही सगळे भेटतो तो दिवस आमच्यासाठी फ्रेंडशीप डे असतो.
.................
मैत्रीसाठी शाळा आणि कॉलेजच लागत नाही तर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या त्या अनोळखी महिलेशीही गप्पांमध्ये मैत्री होते. त्यामुळे जेव्हा ऑफिसला जायला उशीर झालेला असतो..घरातून वैतागून निघालेलो असतो त्यावेळी ट्रेनमध्ये गप्पा मारत फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागता येतं...
माझ्या क़ॉलेजमधल्या एक मॅम..एकदा ओरडताना तू मला नंतर भेटून जा असं सांगून गेल्या आणि त्यानंतर आमची जी मैत्री झाली ती आजही महिन्यातून एकही फोन केला नाही तर तसाच ओरडणारा फोन येतो..घरी येऊन जा... आमच्या कॉलेज कँटीनचे पांडे अंकल..आजही कँटीनमध्ये गेल्यावर कॉफी ऑर्डर केल्यावर कोणालाही न मिळणारी साखर मला वाटीत मिळते..
अँड लास्ट बट नॉट द लिस्ट माझी आ