गुढी उभारली विजयाची शंभुमहाराजांनी...

रोहित गोळेगुढी विजयाची उभारू... असं आज म्हटलं जातं मात्र ह्या विजयाची खरी गुढी उभारली ती शिवपुत्र संभाजी महाराज यांनी... शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शंभुराजानी शेवटपर्यंत लक्षात ठेवली. स्व-धर्मासाठी त्यांनी आपले प्राणही अर्पण केले.

Updated: Mar 22, 2012, 06:40 PM IST

 

रोहित गोळे

www.24taas.com

 

 

गुढी विजयाची उभारू... असं आज म्हटलं जातं मात्र ह्या विजयाची खरी गुढी उभारली ती शिवपुत्र संभाजी महाराज यांनी... शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शंभुराजानी शेवटपर्यंत लक्षात ठेवली. स्व-धर्मासाठी त्यांनी आपले प्राणही अर्पण केले. आणि आपल्या प्राणांचीच जणू त्यांनी गुढी उभारली.

 

गुढीपाडवाच्या नेमक्या आदल्या दिवशी फाल्गुन आमवस्येला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा तुळापूर  शिरच्छेद केला होता. १ फेब्रुवारी १६८९ रोजी शंभुराजे आणि कवी कुलश यांना संगमेश्वर येथे औरंगजेबाच्या सैन्याने अटक केले होते.

 

त्यानंतर त्यांना बहादुरगड येथे नेण्यात आलं होतं. बहादुरगड येथे त्यांचे असंख्य हाल करण्यात आले होते, मोडन पण वाकणार नाही हा मराठी बाणा त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. आणि त्यामुळेच त्यांच्यावर क्रुर आणि माणुसकिला काळिमा फासणारे असे हाल केले गेले, पहिल्याच दिवशी त्यांचे नेत्र फोडण्यात आले, तर दुसऱ्यादिवशी त्यांची जीभ देखील कापण्यात आली. कोडे मारून नंतर अंगावरची चामडी सोलण्यात आली.

 

इतक ं करून देखील हा मराठा राजा आपल्याला दाद देत नाही.. यामुळे औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला फाल्गुनला महाराजांचा शिरच्छेद करण्यात आला. बरोबर दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. महाराजांनी आपले प्राण गमावले पण त्यांनी आपला धर्म बुडवला नाही. त्यामुळेच खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या विजयाची गुढी उभारली. आजही विजयाची गुढी मराठी माणूस मानने मिरवतो आहे.