मुंबई: प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.
अनेकदा ब्रेकअपनंतर जास्त दु:ख होत नाही. पण वेगळं होतांना चांगली पद्धत निवडणं गरजेचं आहे. ज्या नात्याचा शेवट वाईट होतो ते आयुष्यभर आपल्या मनाला सलत राहतं म्हणून असे मार्ग टाळायला हवेत.
जाणून घ्या कोणत्या सात पद्धतीनं ब्रेक अप करू नये -
१. लपण्याचा प्रयत्न करू नका
ब्रेक अपनंतर कधीही लपण्याचा प्रयत्न करू नका, याचा काही उपयोग होत नाही. तो/ती आपल्याला भेटू इच्छिते आणि तुम्ही लपता. मुलगा आपल्याला सतत फोन आणि मॅसेज करतोय आणि तुम्ही पळता. हे चुकीचं आहे. समोर जावून बोलणं, खरं बोलणं कधीही चांगलं. ते दोघांसाठी उत्तम असतं.
२. आपण आता मित्र आहोत असं म्हणणं
असं म्हणून आपण कठोर बनत नाहीत पण हा बरोबर मार्ग नाही. यापूर्वी आपण खूप जवळच्या संबंधांमध्ये असता आणि आता वेगळं झालं म्हणून त्याला मैत्रीचा रंग देणं चूक आहे. त्याच्या किंवा तिच्यासाठी एका झटक्यात तुम्हाला मित्र माननं कठीण असेल.
३. कोणत्या दुसऱ्या मित्राकडून सांगणं
हा तर खूपच वाईट मार्ग आहे. आपल्या नात्यामध्ये कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला आणू नये. जर आपल्यात हिंमत असेल तर स्वत: जावून आपलं नातं तोडावं. कोणत्या दुसऱ्या मित्राद्वारे मॅसेज पोहोचवणं चूक आहे.
४. विश्वासघात करणं
सर्वाधिक वाईट म्हणजे आपण कुणाचा विश्वासघात करणे. त्याला न सांगता आणि कोणतंही कारण न सांगता आपण वेगळं होणं आणि दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडणं चूक आहे. याच कारणाचा समोरच्या व्यक्तीला जास्त त्रास होतो आणि त्याला रागही येऊ शकतो. परिस्थिती बिघडवणं आणि विश्वासघात करण्यापेक्षा आपण खरं बोलावं.
५. मॅसेज करणं
सर्वात सोपा उपाय आपल्याला वाटत असला तरी तो चुकीचा आहे. आपण एक मॅसेज करून स्वत:ला मोकळं समजत असाल. मात्र मॅसेज वाचणाऱ्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतोत जे बोलून सोडवले जावू शकतात.
६. सोशल मीडियावर स्टेटस चेंज करणे
अनेक मुली या अजब प्रकाराचा वापर करतात आणि ब्रेकअप जाहीर करतात. त्या आपलं फेसबुक स्टेटस बदलतात आणि स्वत:ला सिंगल जाहीर करतात.
७. सार्वजनिक रुपात
अनेक मुली मित्रांच्या गराड्यात, सार्वजनिक रूपात अतिशय वाईट शब्दात ब्रेक अप करतात. त्या मुलासोबत वाईट वागतात. अशात नातं संपण्याचं कारण फक्त मुलगा असं त्या भासवतात. अनेकदा ते खरंही असतं पण त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. तेव्हा आपलं नातं तोडतांना जरा जपून...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.