फिंगरप्रिंट सेन्सरसहीत 'वनप्लस 2'ची बाजारात धमाकेदार एन्ट्री

तब्बल 15 महिन्यांपूर्वी चायनीज स्मार्टफोन कंपनी 'वन प्लस'नं भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकलं होतं. याच वनप्लसनं आता जगातील पहिल्या-वहिल्या व्हर्चुअल रिअॅलिटी इव्हेंटमध्ये आपला ब्रँन्ड न्यू फ्लॅगशिप 'वनप्लस-2' हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Updated: Jul 28, 2015, 05:31 PM IST
फिंगरप्रिंट सेन्सरसहीत 'वनप्लस 2'ची बाजारात धमाकेदार एन्ट्री title=

नवी दिल्ली : तब्बल 15 महिन्यांपूर्वी चायनीज स्मार्टफोन कंपनी 'वन प्लस'नं भारतीय बाजारपेठेत पाऊल टाकलं होतं. याच वनप्लसनं आता जगातील पहिल्या-वहिल्या व्हर्चुअल रिअॅलिटी इव्हेंटमध्ये आपला ब्रँन्ड न्यू फ्लॅगशिप 'वनप्लस-2' हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

'वनप्लस-2'साठी तुम्हाला फार वाट पाहावी लागणार नाही. 11 ऑगस्टपासून हा फोन भारत, चीन, कॅनडा, अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल. वनप्लसचा व्हर्चुअल लॉन्चिंग इव्हेंट सकाळी 7.30 वाजता सुरु झाला होता. भारतीय वेळेनुसार याचं लॉन्चिंग सकाळी 10 वाजता झालं. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचहण्यासाठी कंपनीनं या व्हर्चुअल लॉन्चिंग इव्हेंटची मदत घेतली होती. 

'वनप्लस 2' या स्मार्टफोनलाही कंपनीचा क्लासिक ब्लॅक सँडस्टोन कव्हर असेल. हा फोन तुम्हाला केवळ 'अमेझॉन' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध होईल. 

या फोनच्या 16 जीबी मॉडलची किंमत 22,999 रुपये असेल तर 64 जीबी मॉडलची किंमत आहे 24,999

'वनप्लस 2' या स्मार्टफोनचे फिचर्स... 
- स्क्रीन - 5.5 इंच स्क्रिन
- रिझॉल्युशन - 1080 X 1920 पिक्सल 
- ऑपरेटिंग सिस्टम - अँन्ड्रॉईड 5.1 
- गोरिला ग्लास 4चं स्क्रिन प्रोटेक्शन
- इंटरनल मेमरी 16 जीबी, 3 जीबी रॅम
- इंटरनल मेमरी 64 जीबी, 4 जीबी रॅम
- कॅमेरा - 13 मेगापिक्सल
- फ्रंट कॅमेरा - 5 मेगापिक्सल
- इतर फिचर्स - ड्युएल सिम स्मार्टफोन, फिंगरप्रिंट सेन्सर,

पण, या स्मार्टफोनमध्ये मेमरी वाढवण्यासाठी कार्ड स्लॉट उपलब्ध नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.