बॉयफ्रेंड असतानाही मुली दुसऱ्या मुलांसोबत का फ्लर्ट करतात?

कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अनेकदा रिलेशनशिपमध्ये असतानाही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड दुसऱ्याच व्यक्तीशी फ्लर्ट करत असते. हे केवळ मुलंच नाही तर मुलीही करतात. 

Updated: Aug 28, 2016, 12:24 PM IST
बॉयफ्रेंड असतानाही मुली दुसऱ्या मुलांसोबत का फ्लर्ट करतात? title=

मुंबई : कोणत्याही रिलेशनशिपमध्ये प्रेम आणि विश्वास असणे गरजेचे असते. मात्र अनेकदा अनेकदा रिलेशनशिपमध्ये असतानाही बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड दुसऱ्याच व्यक्तीशी फ्लर्ट करत असते. हे केवळ मुलंच नाही तर मुलीही करतात. 

काही मुली बॉयफ्रेंड असतानाही दुसऱ्या मुलांबरोबर फ्लर्ट करतात. तुमच्यासोबतही असेच काहीसे होतेय का तर जाणून घ्या यामागची कारणे.

काही मुलींना अधिक काळजी तसेच अटेंशन हवे असते. जर त्यांना बॉयफ्रेंडकडून अधिक अटेंशन मिळत नसेल तर त्या दुसऱ्या मुलाकडे आकर्षित होतात. 

अनेकदा रिलेशनशिपमध्ये असूनही काही मुलींना एकटेपणा जाणवतो. असुरक्षित असल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे त्या दुसऱ्या मुलाकडे आकर्षित होतात.

एखाद्या मुलीचा बॉयफ्रेंड रोमँटिक नसेल, बोरिंग असेल तर ती दुसऱ्या मुलासोबत फ्लर्ट कऱण्यास सुरुवात करते. 

अनेकदा रिलेशनशिप नको असल्यासही मुली दुसऱ्या मुलाशी फ्लर्ट कऱण्यास सुरुवात करतात.