खूशखबर! व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर लवकरच

व्हॉट्सअॅप ग्राहकांसाठी पुन्हा एकादा खूशखबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कामात व्यस्त असतो आणि आपल्याला व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. मात्र कामात व्यस्त असल्याने आपण ते मॅसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅप युजर्रच्या या समस्येवरही उपाय काढण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सअॅप आता मॅसेज वाचून दाखवण्याची सुविधा युजर्सना देण्याच्या विचारात आहे. 

Updated: Apr 15, 2015, 06:58 PM IST
खूशखबर! व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर लवकरच  title=

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप ग्राहकांसाठी पुन्हा एकादा खूशखबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कामात व्यस्त असतो आणि आपल्याला व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. मात्र कामात व्यस्त असल्याने आपण ते मॅसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅप युजर्रच्या या समस्येवरही उपाय काढण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सअॅप आता मॅसेज वाचून दाखवण्याची सुविधा युजर्सना देण्याच्या विचारात आहे. 

व्हॉट्सअॅप लवकरच 'ड्रायविंग मोड' हे नवीन फीचर युजरसाठी घेऊन येत असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. सध्या या फीचर बाबत जास्त माहिती उपलब्ध नाही, मात्र 'ड्राइविंग मोड' इनेबल केल्यावर व्हॉट्सअप स्वत: मॅसेज वाचून दाखवणार असल्याची माहिती आहे. 

२०१४ मध्ये व्हॉट्सअॅपच्या व्हॉईस कॉलची चर्चा होती, तसं २०१५ मध्ये व्हॉट्सअॅपने व्हॉईस कॉल फिचर लॉंन्च केलं. आता व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉलमध्ये 'कॉल वाया स्काईप' हे फीचर आणण्याच्या विचारात आहे. ज्याद्वारे व्हॉट्सअॅप स्काईपद्वारे थेट कॉल करण्याची सुविधा देणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.