'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं!

व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.

Updated: Apr 1, 2015, 03:13 PM IST
'व्हॉटसअप कॉलिंग' अॅक्टिव्ह करणं आता आणखीन सोप्पं! title=

नवी दिल्ली : व्हॉटसअप युझर्ससाठी एक मोठी खुशखबर आहे... आता तुम्हाला 'व्हॉटसअप कॉलिंग' फिचर्स अॅक्टिवेट करण्यासाठी कुणालाही आपल्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी सांगावं लागणार नाही.

व्हॉ़टसअपनं आपल्या दुसऱ्या व्हॉटस्अप युझर्सना कोणत्याही इन्व्हाईट, हॅक आणि ट्विटशिवाय व्हॉईस कॉल करू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉटस्अपचं व्हर्जन २.१२.१९ डाऊनलोड करावं लागेल. कारण, गूगल प्लेवर सध्या याचं जुनंच व्हर्जन उपलब्ध आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये काही निवडक यूझर्ससोबत आपल्या फिचर्सची टेस्ट केल्यानंतर व्हॉटसअपनं थोड्या मोठ्या स्केलवर हे फिचर रोलआऊट केलंय. यापूर्वी, युझर्सना ही सुविधा अॅक्टिवेट करण्यासाठी, ज्याच्याकडे अगोदरपासून ही सुविधा उपलब्ध आहे अशा व्यक्तींना आपल्या व्हॉटसअपवर कॉल करण्यासाठी विनंती करावी लागत होती. आता हा त्रास व्हॉटसअपनं कमी केलाय. 

आयफोन आणि विंडोज व्हॉटसअपसाठी हे फिचर लवकरच येणार असल्याचं समजतंय. सध्या या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टम्सवर हे फिचर उपलब्ध नाही. 

अॅक्टिव्हेशननंतर व्हॉटसअप युझर इंटरफेस ३ वेगवेगळ्या स्क्रीन्समध्ये दिसतं. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला कॉल लॉग, चॅटस आणि कॉन्टॅक्टचे टॅब दिसतात. चॅटिंग विंडोमध्ये फोनचा आयकॉन असलेलं कॉलिंग बटनही दिसतं. अॅक्टिव्ह कॉल स्क्रीनवर लाऊडस्पीकर सुरू केल्यानंतर चॅट विंडोवर जाण्यासाठी आणि कॉल म्युट करण्यासाठी बटन दिसतात.  

उल्लेखनीय म्हणजे, जानेवारी २०१५ मध्ये व्हॉटसअपचे ७० करो़ अॅक्टिव्ह युझर्स होते आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.