स्मार्टफोनमधील 'किल बटन'मुळं चोरीवर बसेल चाप

स्मार्टफोनची चोरी आणि फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. मात्र यावर चाप बसविण्यासाठी अमेरिकेतील कमीत कमी आठ राज्यांमध्ये फोनमध्ये 'किल बटन' असणं बंधनकारक करत आहे.

Updated: Apr 1, 2015, 01:53 PM IST
स्मार्टफोनमधील 'किल बटन'मुळं चोरीवर बसेल चाप title=

वॉशिंग्टन: स्मार्टफोनची चोरी आणि फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. मात्र यावर चाप बसविण्यासाठी अमेरिकेतील कमीत कमी आठ राज्यांमध्ये फोनमध्ये 'किल बटन' असणं बंधनकारक करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेच्या कनेक्टिकट, इलिनॉयस, मिसिसिपी, मिसौरी, न्यू मेक्सिको, न्यू यॉर्क, ओरेगॉन आणि वर्जिनिया राज्यांमध्ये एक कायदा आणून हे नवं बटन मोबाइलमध्ये सहभागी करण्याला परवानगी देण्याची तयारी केली जातेय. 

नव्या स्मार्टफोनमध्ये एक नवं सॉफ्टवेअर पहिलेपासूनच अपलोड असेल. ज्याच्या मदतीनं मोबाइल चोरी होणं , मोबाइल हरवण्याच्या प्रकरणात स्मार्टफोन रिमोटद्वारे निष्क्रिय केला जावू शकतो. त्यामुळं फोन चोर किंवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या काहीच उपयोगी पडणार नाही. कॅलिफोर्निया आणि मिनेसोटापूर्वी  असा कायदा संसदेत पारित केलाय, ज्यामुळं स्मार्टफोन निर्मात्यांना सर्व फोनमध्ये 'किल बटन' ठेवणं बंधनकारक आहे. हा कायदा यंदा जुलैपासून लागू होईल.

यादरम्यान आलेल्या अनेक रिपोर्टनुसार सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये दूरसंचार उपकरण तयार करणाऱ्या कंपन्यांद्वारे फोनमध्ये 'किल बटन' सहभागी केल्यानंतर स्मार्टफोनच्या चोरीच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्याची नोंद केली गेलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.