मुंबई : सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपने नवं टू-स्टेप व्हेरिफिकेशन फिचर आणलंय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या फीचरची टेस्टिंग सुरु होती.
आता कंपनीने आयओएस, अँड्रॉईड आणि विंडोज स्मार्टफोनसाठी याचे अपडेट देणे सुरु केलेय. टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित होते. या फीचरमुळे ६ अंकाचा पासवर्ड टाकल्याशिवाय कोणीही तुमचा नंबर अॅक्टिव्हेट करु शकत नाही.
हे ऑप्शनल फीचर आहे. हे फीचर सुरु केल्यानंतर तुमचा नंबर व्हेरिफाय करण्यासोबतच तुम्हाला ६ अंकी पासवर्ड निवडावा लागेल. हा पासवर्ड एंटर केल्याशिवाय तुम्ही नव्या फोनवर व्हॉट्सअॅप नंबर अॅक्टिव्हेट करु शकत नाही.
यासाठी या आहेत स्टेप्स - Settings > Account > Two-step verification > Enable.
फीचर ऑन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल अॅड्रेस टाकण्याचा पर्याय दिसेल. जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर व्हॉट्सअॅप तुम्हाला या ईमेलवर लिंक पाठवले ज्यावर क्लिक करुन तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर ऑफ करु शकता.