व्हिडिओ: 'कल हो ना हो'च्या रिमेकमध्ये सलमान खुर्शीद सैफच्या भूमिकेत

माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद आपल्याला रोमान्स करतांना दिसतायेत. जर्मन अॅम्बेसीनं एक व्हिडिओ शुक्रवारी रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये 'कल हो ना हो' गाण्याचा रिमेक केलाय. यात सलमान खुर्शीद यांनी सैफ अली खानची भूमिका साकारलीय.

Updated: Apr 25, 2015, 11:15 AM IST
व्हिडिओ: 'कल हो ना हो'च्या रिमेकमध्ये सलमान खुर्शीद सैफच्या भूमिकेत title=

मुंबई: माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद आपल्याला रोमान्स करतांना दिसतायेत. जर्मन अॅम्बेसीनं एक व्हिडिओ शुक्रवारी रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये 'कल हो ना हो' गाण्याचा रिमेक केलाय. यात सलमान खुर्शीद यांनी सैफ अली खानची भूमिका साकारलीय.

विशेष म्हणजे सिनेमातील टायटल ट्रॅकवर सलमान खुर्शीद यांनी डान्सही केला आहे. या डान्सचा व्हिडीओ यू ट्यूबवर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये शाहरूखच्या भूमिकेत स्वत: भारतातील राजदूत मायकल स्टॅनर आहेत, तर त्यांची पत्नी एलिस यांनी प्रीती झिंटाचा रोल निभावला आहे.
 
स्टॅनर यांनी बॉलिवूडच्या १५० पेक्षा अधिक फिल्म पाहिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी शाहरुखच्या प्रत्येक स्टेप कॉपी केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये हॉस्पिटलचा तो सीनही घेण्यात आला आहे, ज्यामध्ये शाहरुखच्या आईचा रोल आहे, ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर दिसतात.
 
दिल्लीत शुक्रवारी हा व्हिडीओ लाँच करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे यावेळी अभिनेता सैफ अली खान आणि त्याची आई शर्मिला टागोरही उपस्थित होते. तसंच गीतकार जावेद अख्तर हे सुद्धा यावेळी हजर होते.
 
“राजकारणी हे उत्तम कलाकार असतात, हे मी नेहमी म्हणतो, ही डॉक्टुमेंट्री त्याचा पुरावा आहे”, असा टोमणा जावेद अख्तर यांनी यावेळी लगावला.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.