दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंग फ्री

व्होडाफोननं त्यांच्या ग्राहकांना दिवाळी बोनस दिला आहे. दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना देशभरात रोमिंगमध्ये इनकमिंग कॉलिंग फ्री मिळणार आहे.

Updated: Oct 21, 2016, 05:47 PM IST
दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना रोमिंगमध्ये इनकमिंग फ्री title=

मुंबई : व्होडाफोननं त्यांच्या ग्राहकांना दिवाळी बोनस दिला आहे. दिवाळीपासून व्होडाफोन ग्राहकांना देशभरात रोमिंगमध्ये इनकमिंग कॉलिंग फ्री मिळणार आहे. जिओला धक्का देण्यासाठी व्होडाफोननं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

रिलायन्स जीओनं देशभरात कुठेही फ्री व्हॉईस कॉलिंग सुविधा दिल्यामुळे सगळ्याच कंपनींकडून वेगवेगळ्या ऑफर देण्यात येत आहेत. सध्या बीएसएनएल सोडून सगळ्याच कंपनी रोमिंगमध्ये इनकमिंग चार्ज घेत आहेत.